औरंगाबाद जिल्ह्यात 15 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

दोन टप्प्यात काहीशी सूट 
औरंगाबाद जिल्ह्यात 15 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात Break The Chain अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना 1 मे 2021 रोजीचे सकाळी 7 वा. पासून ते 15 मे 2021 रोजीचे सकाळी 7 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 16 एप्रिल रोजीच्या मूळ आदेशतील सर्व बाबी कायम राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात आले आहेत. ह्या आदेशातील नमूद सर्व बाबी हया संपूर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू करण्यात येत आहेत.

मुस्लीम बांधवांचा रमजानचा महिना लक्षात घेऊन दुध व फळे विक्री संबधी दुकाने पहिल्या टप्प्यात सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत व दुस-या टप्प्यात सायं. 5.00 ते 8.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास दिलेली विशेष परवानगी यापुढेही 13.05.2021 पर्यंत अंमलात राहील.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कमल 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com