Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedट्विटरवर मोदींना मानाचे पान; जगात अव्वल

ट्विटरवर मोदींना मानाचे पान; जगात अव्वल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोशल मीडियावर (Social Media) फॉलो केलेल्या भारतीय नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत…

- Advertisement -

मोदींच्या ट्विटर हँडलवर (Twitter handle) फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन म्हणजे 7 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स (followers) असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

याशिवाय पंतप्रधान मोदी (PM Modi) जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात ‘लोकप्रिय नेते’ (The Most Popular Leader) ठरले आहेत.

याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे पहिल्या स्थानी होते. ट्रम्प यांना 8.87 कोटी लोकांनी फॉलो केले होते. परंतु त्यांचे अकाऊंट आता बंद झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पर्सनल अकाऊंटला 88.7 मिलियन लोक फॉलो करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होते.

नरेंद्र मोदींना 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख लोक फॉलो करत होते. आता मोदींच्या फॉलोअर्सची ही संख्या वाढून 70 मिलियन म्हणजे 7 कोटी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या