औरंगाबाद भूलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संगीता देशपांडे

औरंगाबाद भूलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संगीता देशपांडे

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद भूलतज्ञ संघटनेची नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदावर डॉ. संगीता देशपांडे President Dr. Sangeeta Deshpande यांची तर सचिव पदावर डॉ.सुजाता झिने यांची निवड झाली आहे.

नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आयएमए हॉलमध्ये झाला. यात कोषाध्यक्ष पदावर डॉ.सचिन नाचणे, उपाध्यक्ष डॉ. भूषण मोहरीर आणि सहसचिव पदावर डॉ. श्रीगोपाल भट्टड यांची निवड करण्यात आली. कार्यकारी समितीत डॉ. रश्मी जोशी, डॉ. संजय इटापे, डॉ. जयेश टकले, डॉ. रेणू मारावार, डॉ.प्राची केळकर, डॉ. अभिजीत कबाडे आणि डॉ.स्नेहा सिकची यांचा समावेश आहे.

नूतन अध्यक्ष डॉ.संगीता देशपांडे यांनी मावळते अध्यक्ष डॉ. संजय पुरोहित यांच्याकडून सूत्रे स्वीकारला. याप्रसंगी मावळते सचिव डॉ.वासंती केळकर, महाराष्ट्र भूलतज्ञ संघटनेचे (आयएसए) अध्यक्ष डॉ. मिलिंद पोळ, सचिव डॉ. बालाजी आसेगावकर तसेच महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com