Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedनाथषष्ठी सोहळ्याची जय्यत तयारी

नाथषष्ठी सोहळ्याची जय्यत तयारी

औरंगाबाद – aurangabad

राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक (Paithan) पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास 600 दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह (Covid vaccine) कोविड लस घेणे आवश्यक आहे. तसा लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून (Aadhar Card, Driving License) आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे. त्याचबरोबर शासनाने सांगितलेल्या कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नाथ षष्ठी सोहळ्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार डी.बी.निलावाड, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहूल, नाथ वंशज रघुनाथबुवा गोसावी, योगेश गोसावी, मधुसुदन रंगनाथबुवा, छैय्या महाराज गोसावी, हरिपंडित गोसावी, विनित गोसावी, श्रेयस गोसावी, नगर पालिका मुख्याधिकारी संतोष आगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सु.सो.शेळके, डॉ.पी.एम. कुलकर्णी आदींसह सर्व यंत्रणांचे प्रमुख आदींची उपस्थिसती होती.

नाथषष्ठी निमित्त 20 ते 25 मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये 20 व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार करावी. याशिवाय 10 व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

पैठणमध्ये भाविक दाखल होण्यास सुरूवात होत असल्याने पाटबंधारे विभागाने 20 ते 25 मार्च या कालावधीत गोदावरी नदीपात्रात 1.00 Mcum पाणी सोडण्यास सुरूवात करावी. यासाह पोलिस यंत्रणांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा. वीज विभागाने लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक त्याठिकाणी जनित्रांची व्यवस्था करावी. नगर पालिका प्रशासनाने आवश्यक त्या कामांसह स्वच्छतेवर भर द्यावा. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या साधनसामुग्रीसह पथके तयार ठेवावीत, आरोग्य यंत्रणांनी मुबलक औषध साठ्यांसह आरोग्य पथके नेमावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या