‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ ची तयारी पूर्ण
Abdul Shaikh

‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ ची तयारी पूर्ण

राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन

औरंगाबाद Aurangabad

राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन (Industrial Exhibition) ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३’ (Advantage Maharashtra Expo 2023')तयारी पूर्ण झाली असून औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी ऑरीक येथे ५ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान उद्योजकांचा महाकुंभ (Maha Kumbh of entrepreneurs) भरणार आहे. उद्योजकांची संघटना मसिआच्यावतीने आयोजित केलेले प्रदर्शन तब्बल ३० एकरांवर भरणार असून ४ दिवसात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. मराठवाड्यातील उद्योग वाढीसाठी प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा आयोजकांचा विश्वास आहे.

मसिआच्यावतीने दर तीन वर्षानी ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो’ औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान भारतातील पहिले स्मार्ट औद्योगिक  शहर ऑरीक सिटी, शेंद्रा येथे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर मांडणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन देणे, लघु उद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे तसेच नवीन उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देणे हे प्रदर्शनाचे उद्धिष्ट आहे. मसिआसोबत महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, एमआयडीसी आणि ऑरीक सिटीच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, कनव्हेनर अभय हंचनाळ तसेच सचिव राहुल मोगले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष

भारत देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमीत्ताने प्रदर्शनाची व्यात्पी मोठी करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. एमएसएमईंना चालना देण्यासाठी, त्यांना जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून या प्रदर्शनाकडे बघीतले जात आहे. महाराष्ट्रासह देश आणि जगभरातील उद्योजकांना प्रदर्शनात आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी खास प्रयत्न केले आहेत. प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या सहभागी आहेत.

 नामांकित कंपन्यांचा सहभाग

रेल्वे विभाग, सिमेन्स, इंडयूरन्स, एंडर्स हाऊजर सारख्या नामांकित कंपन्या लघु उद्योजकांना काम देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी खास बीटूबी मिटींग आयोजित करण्यात आल्या आहेत. अनेक कंपन्यांचे पर्चेस व मटेरियल अधिकारी भेटी देतील. यात प्रामुख्याने रॉयल एनफील्ड, भारत फोर्ज, जेसीबी, आनंद ग्रुप, बजाज ऑटो लि. , इंडयूरन्स, व्हेरॉक, संजीव ऑटो आदींचा सहभाग आहे. तसेच विविध विषयावर सेमिनार, व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आदीतून उद्योजकांना नक्कीच फायदा होणार असल्याचे आयोजकांचे मत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com