Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedगर्भवती महिलांनाही घेता येणार लस; अशी आहे नोंदणी प्रक्रिया

गर्भवती महिलांनाही घेता येणार लस; अशी आहे नोंदणी प्रक्रिया

नाशिक | प्रतिनिधी

गर्भवती महिला (Pregnant woman) आता करोनाची लस (Covid 19 Vaccination) घेऊ शकणार आहेत. लसीकरणासाठी गर्भवती महिलांना CoWIN Application वर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. याबाबतचे आदेश नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काढण्यात आले आहेत….

- Advertisement -

Cowin Application वर नोंदणी केल्यानंतर गर्भवती महिलांना लस घेण्यासाठी COVID-19 वॅक्सीन सेंटरवर जावे लागेल. यानंतर याठिकाणी लस टोचली जाणार आहे.

आत्तापर्यंत बाळाला जन्म दिलेल्या म्हणजे स्तनदा मातांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता गर्भवती महिलांच्या आणि त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना देशाच्या आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात दिशानिर्देश दिले असून गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण या महिलांसाठी उपयोगी असून त्यांनी लस दिली पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या