Friday, April 26, 2024
HomeUncategorized'निधी नसताना कामे कशाला काढली'?

‘निधी नसताना कामे कशाला काढली’?

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद महानगरपालिकेत (Municipal Corporation) पदाधिकारी नसल्याने गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक सर्वेसर्वा असल्याप्रमाणे वाट्टेल ती कामे करत राहिले. सर्वसामान्य जनतेच्या हितापेक्षा तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि त्यावेळचे पालकमंत्री यांना खूश करण्यासाठी प्रशासक दिवसरात्र एक करत होते. हे सगळे सुरू होते तत्कालीन महाविकास आघाडीच्या मनमानी कार्यकाळात. आता सत्तांतर झाल्याने प्रशासकांनी केलेल्या बोगस कामांची उजळणी सुरू झाली आहे. निधी नसताना भरमसाठ रकमेची कामे काढून त्यांचे टेंडरिंगचा पर्दाफाश झाला आहे. सहकार मंत्र्यांनी तत्कालीन प्रशासकांनी केलेल्या कामांचे रिव्ह्यू घेण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, स्मार्ट सिटीतून ३१७ कोटींच्या रस्ते कामांचे टेंडर झाले. काही कामे सुरू झाली. आता अचानक निधीच नसल्याचा साक्षात्कार झाला. पैसे नाहीत म्हणून तुम्ही ८४ कामे थांबवली. तुमच्याकडे निधीच नव्हता तर मग निविदा काढल्या कशा? ही लाखो औरंगाबादकरांची फसवणूक आहे. त्यामुळे आता थेट गुन्हा दाखल करू, असा इशारा सहकारमंत्री अतुल सावे यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दिला. तर निकषात बसवून दिल्यास रस्त्यांसाठी केंद्राकडून निधी मिळेल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड म्हणाले. दरम्यान, माजी प्रशासकांच्या नेतृत्वात नवी पाणीपुरवठा योजना अमृत-२मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारची शिफारस न घेता वेबसाइटवर थातूरमातूर अपलोड करण्यात आला, असेही उघड झाले.

डॉ. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मार्ट सिटीची आढावा बैठक झाली. यावेळी सावे, माजी महापौर भगवान घडामोडे, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे सीईओ तथा मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी हे मात्र गैरहजर होते. त्यासाठी त्यांनी डॉ. कराड यांची परवानगी घेतली होती. बैठकीत स्मार्ट सिटीचे विविध प्रकल्प, नवीन पाणीपुरवठा योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. सीईओ चौधरींनी शहरातील ३१७ कोटींच्या रस्ते कामांना स्थगिती दिली आहे. या तसेच मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी नसल्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

सायकल ट्रॅकवर नाराजी

दीड वर्षापूर्वी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हट्टापोटी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून क्रांती चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. त्याबद्दल त्या वेळी आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यावर टीका केली होती. बैठकीत डॉ.कराड, सावे यांनीही या ट्रॅकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा ट्रॅक चुकीच्या ठिकाणी केला आहे. सध्या तिथे एकही सायकल जात नाही. उलट ती जागा दुकानदार पार्किंगसाठी वापरत आहेत, असे सावे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या