Friday, April 26, 2024
HomeUncategorizedखबरदार...तेढ निर्माण करणारे मेसेज कराल तर

खबरदार…तेढ निर्माण करणारे मेसेज कराल तर

औरंगाबाद – aurangabad

सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनसे प्रमुख (Raj Thackeray) ज ठाकरे यांची येत्या १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर आता (police)) पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे चुकीचे (Photos, videos and messages) फोटो, व्हिडीओ आणि संदेश सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करणारे पोलिसांच्या रडारवर असून (Cyber ​​Police) सायबर पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर राहणार आहे. चुकीचे मॅसेज कोणीही तयार किंवा व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Police Commissioner Dr. Nikhil Gupta) यांनी दिला आहे.

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर अनेक मॅसेज येत असतात. मात्र, त्याची कोणतीही खातरजमा न करता ते पुढे पाठविले जातात. विशेष म्हणजे यामध्ये अनेक चुकीच्या, भडकाऊ गोष्टी देखील नागरिक व्हायरल करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन दोन समाजात तेढ व संघर्ष निर्माण होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आता पोलीस दल आणखी सतर्क झाले आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारीत करणार्‍यांवर आता सायबर पोलिसांची नजर राहणार आहे.

औरंगाबाद शहर कायमच संवेदनशील म्हणून ओळखले जाते. शहराला दंगलीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भडकाऊ किंवा धार्मिक तेढ निमीण करणारे मॅसेज जर व्हायरल झाले तर कायदा व सुव्यस्वस्थेचा मोठा प्रश्न निमीण होऊ शकतो. त्याअनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी पोलीस दल घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय हा सर्वस्वी स्थानिक पोलिस प्रशासनाचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळते की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

परवानगी घेवूनच भोंगे लावा

लाऊडस्पीकर (भोंगा) संदभात २००५ साली सर्वोच्च न्यायालयाने नियमावली दिलेली आहे. राज्य शासनाने देखील आदेश काढलेले आहेत. त्यानुसार कोणतेही लाऊडस्पीकर हे परवानगी शिवाय लावता येत नाही. लाऊडस्पीकरचा आवाज आणि वाजवण्यासाठी काही अटी शर्ती आहेत. त ती लाऊडस्पीकर लावले असतीलत्यांनी ते स्थानिक ठाण्यात रितसर अर्ज देऊन लाऊडस्पीकर अधिकृत करून घ्यावे. रितसर परवानगी न घेता लाऊडस्पीकर लावणाऱयांवर थेट कारवाई करण्यात येईल, असे देखील पेलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या