औरंगाबादला पोलिसांचे 'कोम्बिंग ऑपरेशन'

१० गुन्हेगार जेरबंद
औरंगाबादला पोलिसांचे 'कोम्बिंग ऑपरेशन'
USER

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या (Commissionerate of Police) वतीने शहरात सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) २, ३ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आले. ३० तास राबविण्यात आलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १० गुन्हेगार पकडण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.

शहरातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संशयित आणि अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध ३० तास कारवाईचा बडगा. अवैध दारू, गुटख्याचा साठा, तलवारी जप्त. शहरातून एक लाख रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

गणेश सुधाकर कवडे, शेख मोहसीन शेख खैरू, गणेश संजय डाखोळे या तिघांना पकडून त्यांच्याकडून तलवारी जप्त केल्या. मागील काही दिवसांपासून शहरात वाहन चोरी, घरफोडी, खून, मंगळसूत्र, मोबाइल, रोख रक्कम हिसकावणे, नागरिकांची लूटमार यासारखे गंभीर गुन्हे वाढले आहेत.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी दू. ४ ते ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी दुपारी चारपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. रविवारी रात्री बाराच्या सुमारास हे ऑपरेशन संपले. या मोहिमेत संशयित ईमान अमजद खान (वय ३२, रा. बुढीलेन), तेजेंद्रसिंग नथासिंग ग्रंथी, शेख अमन शेख सलीम, श्याम किसन साबळे (वय ३४, रा. पुष्पनगरी सोसायटी, कमळापूर, रांजणगाव शेणपुंजी), सय्यद मुजाहेद सय्यद युसूफ (वय ४४, रा. संजयनगर, बायजीपुरा), सचिन गणेश बोडखे (वय २५, रा. जयभवानीनगर), राहुल रमेश साळवे (वय २१, रा. अण्णा भाऊ साठे चौक, मिलींदनगर, उस्मानपुरा), विठ्ठल उर्फ भावड्या राऊसाहेब नजन (वय २०, रा. अविनाश कॉलनी, वाळुज) आणि ज्ञानेश्वर काकासाहेब शेळके (वय ३६, रा. पार्किंग गेट, वाळुज) यांना पकडण्यात आले. हद्दपार गुन्हेगार मंगेश मारुती भालेराव (वय ३०, रा. राजीवनगर, रेल्वे स्टेशन परिसर) याला वेदांतनगर पोलिसांनी अटक केली. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान छापा मारून पोलिसांनी गणेश संजय डाखोळे (वय २१, रा. लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी), गणेश सुधाकर कवडे (वय २०, रा. लघुवेतन कॉलनी), शेख मोहसीन शेख खैरू (वय २९, रा. हुसेन कॉलनी, गल्ली क्र. ४) या तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवारी जप्त केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com