सव्वाशे जिवंत डेटोनेटर्सचा साठा

फरार आरोपी जेरबंद 
सव्वाशे जिवंत डेटोनेटर्सचा साठा

औरंगाबाद - aurangabad

कोंबिंग ऑपरेशन (Combing operation) दरम्यान पोलिसांनी एका घराच्या झडतीत तब्बल 126 जिवंत इलेक्ट्रीक डेटोनेटर (Electric detonator) जप्त केल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी गेवराई ब्रुकब्राँड येथे उघडकीस आली होती. तेंव्हापासून गुन्ह्यातील आरोपी पसार होता. तपास सुरु असतांना आरोपी (Ranjangaon) रांजणगाव (जि. पुणे) येथे असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलिसांना (police) तब्बल दोन महिन्यांनी पहाटे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

जितेंद्र ऊर्फ जितु संतोषसिंग टाक (28, रा. गेवराई ब्रुकबाँड आलाना ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात चिकलठाण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदिप ठुबे (30) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, 17 ऑगस्ट रोजी ठाण्याचे सहायक निरीक्षक पाटील, सहायक फौजदार लुटे, कटकुरे, हवालदार राठोड, साळवे व इतर कर्मचारी गेवराई तांडा येथे झालेल्या किराणा दुकानाती चोरी बाबत तपास करित होते. तपासादरम्यान पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवत असतांना पोलिसांना आरोपीच्या घराचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यात पोलिसांनी तब्बल 126 जिवंत इलेक्ट्रिक डेटोनेटर जप्त केली. विशेष म्हणजे, ही डेटोनेटर 12 प्लास्टीकच्या बरण्यांमध्ये कापुस टाकून सुरक्षीत ठेवण्यात आले होती. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा घडकीस आल्यापासून आरोपी हा पसार होता. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना आरोपी हा पुण्यातील रांजणगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने आरोपीला बेड्या ठोकल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com