दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

दोन वाहनासह सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

शेगाव - प्रतिनिधी Shegaon

(lcb) स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा (Buldhana) पथकाने शेगाव वरवट (Shegaon Varvat) मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून एक दुचाकी व चारचाकी वाहनासह एकूण सात लाख दहा हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन (Shegaon City Police Station) अंतर्गत अवैध धंदे व गुन्ह्याच्या शोधा करिता (lcb) स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा बुलढाणाचे निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखालीएक पथक गस्त घालीत होते गस्त घालीत असताना शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहरातील शेगाव वरवट मार्गावर (Gas) भारत गॅस गोडाऊन जवळ अंधारात एक वाहन क्रमांक एम एच 48 एम 8799 लाईट बंद करून उभे होते या वाहनच बाजूला एक युनिकोन दुचाकी वाहन क्रमांक एम एच 28 बिडी 58 44 या दुचाकी वर बसलेले दोन इसम चारचाकी वाहनाच्या आत बसलेल्या इसमांशी बोलत असल्याचे दिसून आले.

सदरच्या वाहनांची स्थिती पाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आला संशयावरून विशाल गोपाल इंगळे 23 वर्ष राहणार पारंबी तालुका मुक्ताईनगर Muktainagar) जिल्हा (jalgaon) जळगाव, निलेश मधुकर धामोडे वय 34 वर्षे राहणार कुन्हा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, परमेश्वर रघुनाथ भोला नगर वय 21 वर्षे राहणार काकोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, भूषण प्रभाकर चांडक वय 21 वर्षे राहणार कुल्ला तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, आरिफ फरीद तडवी वय 24 वर्षे राहणार चंदनखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, प्रथमेश सुरेश चोपडे वय 21 वर्षे राहणार कुन्हा मुक्ताईनगर जिल्हा जळगाव , मुफिस अहमद अब्दुल रफिक वय 34 वर्षे नर्सरी पुरा जळगाव जामोद तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा अवदेश रामेश्वर पवार वय 23 वर्षे राहणार वाडी जळगाव जामोद तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातील वाहनांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून व घटनास्थळावरून लालसर मिरचीपूड असलेली पॉलिथिन पिशवी दोन पांढऱ्या रंगाची अंदाजे दहा फूट लांबीची सुती दोरी, तांबे धातूचे डब्यात सोनेरी रंगाचे धातूचे गोल 50 शिक्के, दोन लाकडी दांडे एक लोखंडी तलवार एक लोखंडी चाकू सत्तूर एक लोखंडी धातूचा सुरा एक काचेची बंद नळी त्यामध्ये द्रव्य सदस्य लाल रंगाचा पदार्थ 12 मोबाईल नगदी पंधराशे रुपये चार चाकी वाहन क्रमांक एम एच 48 एम 8799, एक दुचाकी वाहन क्रमांक बिडी 58 44 असा एकूण सात लाख दहा हजार 450 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल जप्त करून आरोपी इसम हे संगनमताने शेगाव शहरात जप्त मुद्दे मालाचा वापर करून लूटपाट करण्याच्या इराद्याने दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना मिळून आले याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध कलम 399 402 भा द वि सह कलम 4, 25 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणामुळे शेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.