Friday, May 10, 2024
HomeUncategorizedराज सभा ; मनसैनिकांचा उत्साह शिगेला!

राज सभा ; मनसैनिकांचा उत्साह शिगेला!

औरंगाबाद – aurangabad

मनसेचे सर्वेसर्वा (Raj Thackeray) राज ठाकरे यांची रविवारी (१ मे) औरंगाबादमध्ये होणारी सभा ऐतिहासिक करण्यासाठी मनसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. तब्बल आठ वर्षांनी राज ठाकरे यांची सभा शहरात होत आहे. मुंबई-ठाण्याप्रमाणे या सभेला मोठी गर्दी उसळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरातील शांतता भंग होऊ नये यासाठी (police) पोलीस प्रशासनही मैदानात उतरले आहे.

- Advertisement -

Raj Thackeray सभेच्या विरोधात याचिका करणाऱ्याला लाखाचा दंड

(Maharashtra Navnirman Sena) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी १६ अटी-शर्ती घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. सभेची जय्यत तयारी केली जात आहे. या सभेसाठी मुंबई येथून राज ठाकरेंची आवडती विशेष साउंड सिस्टीम मागवण्यात आली आहे, अशी माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.

या सभेसाठी विविध अटीशर्ती घालून पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मनसे पदाधिकाऱ्यांनी सभेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. या सभेसाठी येताना लोकांना पाससोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. एका पासवर दोन जणांना सभेत प्रवेश मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २५ हजार पास छापून आणल्या होत्या.

सभेच्या नियोजनासाठी शुक्रवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात मनसे नेते आणि पोलीस आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत पोलिसांच्या वतीने वाहतूक, सुरक्षा व्यवस्था याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रकाश महाजन, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राजीव जवळीकर यांसह आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहर परिसर आणि कार्यकर्त्याच्या मार्गावर राहणार आहे. शिवाय बाहेरून पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. तसेच सभेवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. अनुचित प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या