'चाईल्ड हेल्प लाईन'चा माहितीफलक दर्शनी भागात लावा

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
'चाईल्ड हेल्प लाईन'चा माहितीफलक दर्शनी भागात लावा

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्हयात कोविड- 19 या आजाराने दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभाकरिता कृतीदलाची (टास्क फोर्स) ची स्थापना करण्यात आली असून अशा बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नं. 1098 या क्रमांवर संपर्क साधून गरजूंनी या योनजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 या बाबतचा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही संबंधित विभागाला दिले.

कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. ज्योती पत्की, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, पोलीस निरीक्षक बी.जी.कोळी, पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे निरिक्षण गृहाकरिता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करुन पथकांतर्गत येथील कर्मचाऱ्यांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे अशा सूचना देत चव्हाण यावेळी म्हणाले की, कोविड -19 या आजाराकरीता रुग्णालयात दाखल होतेवेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रुग्णाकडून भरुन घेण्याबाबत सर्व रुग्णालयांना निर्देश दिले. तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 याबाबतचा माहिती फलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेणे, बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करुन देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे, दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करणे, अशा पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरिता दक्षता घेणे, या बालकांच्या दत्तक प्रक्रीयेची आवश्यकता असल्यास प्रचलित CARA मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करणे, आवश्यक असलयास बालकासाठी समुदेशनाची व्यवस्था करणे, आदी सूचना यावेळी चव्हाण यांनी संबंधित सदस्य असणाऱ्या विभागाला दिल्या.

महिला व बाल विकास विभागतंर्गत शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भावच्या काळात राज्यातील बालकांची काळाजी संरक्षकाचे काम करणाऱ्या संस्थामधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात येत असुन या कृती दलामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बालकांच्या (1) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोविड-19 मुळे मृत्यू पावले आहेत व बालकांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. (2) ज्याचे दोन्ही पालक कोविड-19 मुळे दवाखान्यात भरती आहेत व बालकाला तात्पुरता आश्रय पाहिजे असेल (3) कोविड-19 मुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रेन्स- 7400015518/8308992222 अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद -9822762157, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, औरंगाबाद-9370003517 या क्रमांक वर संपर्क साधावा.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com