Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedपीएफ ई-नॉमिनेशन डेडलाईन रद्द

पीएफ ई-नॉमिनेशन डेडलाईन रद्द

औरंगाबाद – aurangabad

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (epfo) संघटनेने ‘पिफ’ सदस्यांना वारसांचे (nomination) नॉमिनेशन दाखल करण्यासाठी ऑनलाइन (Online) सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु ई-नॉमिनेशन (E-nomination) करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याने अखेर ई-नॉमिनेशन दाखल करण्यास ‘ईपीएफओ’ने मुदतीची अट शिथिल केली आहे.

- Advertisement -

भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेल्या रकमेसाठी वारस (नॉमिनी) नेमण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ही ई-नॉमिनेशन सुविधा सुरू केली आहे. याबाबत सविस्तर माहिती ईपीएफओ युनिफाइड पोर्टलच्या सदस्य इन्टरफेस (https://unifiedportal-em.epfindia.gov.in/memberinterface/) वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी पीएफ सदस्यांचा (Aadhaar card) आधार कार्ड पीएफ खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर व आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) कार्यान्वित असल्याची खात्री करून घेतल्यानंतर हे ई-नॉमिनेशन करता येते.

पीएफ खातेधारक आपल्या खात्याशी ई-नॉमिनेशनद्वारे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी करू शकतात. ई-नॉमिनेशनद्वारे ऑनलाइन पेन्शन क्लेम करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ई-नॉमिनेशन झाल्यानंतर, खातेधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नॉमिनी पीएफसाठी ‘ऑनलाइन क्लेम’ करू शकतो.

ई-नॉमिनेशनसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मराठवाड्यात दोन लाख ५३ हजारांच्या घरात पीएफ सदस्य आहेत. यापैकी निम्म्याही लोकांनी त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. त्यात ई-नॉमिनेशनसाठी ऑनलाइन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची ओरड होत आहे. याबाबत काही तक्रारीही विभागाला प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन देण्यात आलेली ३१ डिसेंबरची मुदत रद्द करून मुदतीची अट आता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पीएफ सदस्य व त्यांच्या वारसांसाठी ही ऑनलाइन सुविधा महत्त्वाची आहे. त्यांचा सर्व सदस्यांनी लाभ घ्यावा, ई-नॉमिनेशन करून घ्यावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या