पेट्रोल 5 तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त

पेट्रोल 5 तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. देशात पेट्रोल आण डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी स्वस्त होणार आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.

अबकारी करात केंद्राने कपात केल्याने हे भाव कमी झाले आहेत. या निर्णयामुळे ऐन दिवाळीत वाहनचालकाना दिलासा मिळाला आहे.

देशात गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115 वर तर दिल्लीत पेट्रोल 107.94 झालं होतं.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या भडका उडाल्याने महागाईत भर पडली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही मोठा परिणाम होणार झाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com