Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedराज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पण...

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पण…

औरंगाबाद – aurangabad

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादेत होणार्‍या सभेला गुरुवारी उशिरा पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता (Commissioner of Police Dr. Nikhil Gupta) यांनी १६ अटी शर्तीसह परवानगी दिली. त्यामुळे येत्या १ मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

राणा दाम्पत्याचा मुक्काम कोठडीतचPhoto Gallery : ‘मै थुकेगा नही’…, बाहुबली की नही तो झाडुबली की जरूरत है!

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देताना पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी विविध प्रकारच्या सुचना केल्या आहेत. तसेच गुरूवारी पोलिस आयुक्तांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची पाहणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान औरंगाबादला १ मे रोजी जाहीर सभा घेवून ३ मे रोजी अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तेंव्हापासून औरंगाबाद शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

शहराच्या विविध भागात वाहनरॅली काढुन शहरवासीयांना राज ठाकरे यांच्या सभेचे निमंत्रण पत्रिका देण्यास सुरुवात केली आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, दिलीप बापू धोत्रे आदी शहरात तळ ठोकून असून ते सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. गुरूवारी सायंकाळी उशिरा विविध प्रकारच्या १६ अटी-शर्तीसह राज ठाकरे यांच्या सभेला पोलिस प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली.

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून शुक्रवारपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्टेज उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानास भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपायुक्त उज्वला वनकर, शहर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक थोरात, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल दुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, विशेष शाखेचे निरीक्षक खटाने आदींची उपस्थिती होती.

सभा दुपारी साडेचार ते रात्री पावणेदहा या वेळेतच घ्यावी. ठिकाण आणि वेळेत बदल करू नये.

सभेत येणाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. हुल्लडबाजी, आक्षेपार्ह घोषणाबाजी, असभ्य वर्तन करू नये. सभेला कोणीही तलवारी, स्फोटके, शस्त्रे जवळ बाळगू नयेत.

पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. पार्किंग व्यवस्था ठरलेल्या ठिकाणीच होईल.

वरील अटींची माहिती नागरिकांना देण्याची जबाबदारी संयोजकांची आहे.

संयोजकांनी स्वयंसेवक नेमावेत. त्यांचे मोबाइल क्रमांक पोलिसांना

द्यावेत.

सभास्थानी आसनव्यवस्था १५ हजार आहे. अधिक लोकांना बोलावू नये.

कुठल्याही अत्यावश्यक सेवांना बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी.

सभेला येणाऱयांच्या सुरक्षेची काळजी म्हणून योग्य ती तपासणी करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. यात व्यत्यय येणार नाही. याची दक्षता घ्यावी.

सभेत महिला व पुरुषांची स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, स्वच्छतागृहाचीही सोय करावी.

विद्युत यंत्रणा, बॅरिकेड्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी. बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था अगोदरच करावी.

सभेदरम्यान मिठाई, अन्नदान वाटप होत असल्यास त्यातून विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कोणतीही व्यक्‍ती किंवा समुदायाचा अनादार होईल, असे वक्‍तव्य टाळावे.

सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे व्यक्तव्य करू नये.

सर्वोच न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.

धर्म, भाषा, जात, वंश यावरून चिथावणी देणारी भाषणे टाळावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या