'गर्भसंस्कार’ रुजविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा-जिल्हाधिकारी

'गर्भसंस्कार’ रुजविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा-जिल्हाधिकारी

औरंगाबाद - aurangabad

बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भावस्थेपासून होते. यासाठी गर्भसंस्कार ही देखील महत्वाची पध्दती आहे. गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकविणे व सकारात्मक विचार, नैतिक मूल्य गर्भसंस्कामधून मिळतात. यातून भावी पिढी सुदृढ व सर्व गुणसंपन्न निर्माण व्हावी म्हणून गर्भसंस्काराचे महत्व रुजविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

'गर्भसंस्कार @ नवीन पाऊल’ या उपक्रमाची सुरवात शुक्रवार 12 जानेवारीपासून करण्यात येणार आहे. यानंतर दर शुक्रवारी आणि शनिवारी गंर्भसंस्कारावर मार्गदर्शन करणा-या तंज्ञाच्या व्याख्यानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे. समाज माध्यमातील व्हाट्अप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टिव्टर व युट्युब चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम परिचारीका यांच्यामार्फत मोबाईलच्या माध्यमातून हे व्याख्यान गर्भवतींपर्यंत पोहचविण्यात येणार असून या व्याख्यानाचा नागरिकांनी आणि विशेषत: गर्भवतींनी लाभ घेण्‍याचे आवाहन श्री. पाण्डेय यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com