Saturday, April 27, 2024
HomeUncategorized'Paytm कॅशबॅक'द्वारे युजर्सची होऊ शकते फसवणूक

‘Paytm कॅशबॅक’द्वारे युजर्सची होऊ शकते फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी

सध्या पेटीएमवरुन एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात 2 हजार 647 रुपयांचा कॅशबॅक ग्राहकांना ऑफर केला जात असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनमुळे डिजिटल व्यवहारात मोठी प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. पेटीएमवरुन फ्रॉडचे नवे प्रकरण आता समोर आल्यामुळे युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे….

- Advertisement -

फेक वेबसाईटवरुन फोनवर एक मेसेज पॉपअप होत आहे, ज्यात ‘अभिनंदन, तुम्हाला पेटीएम स्क्रॅचगार्ड मिळालं आहे’ असा मेसेज दिसतो.

युजरने यावर क्लिक केल्यानंतर, Paytm-cashoffer.com वर रिडायरेक्ट केले जाते. कंपनीचे सीईओ विजय शेखर यांनी युजर्सना सावध राहण्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली.

paytm-cashoffer.com ही लिंक केवळ स्मार्टफोनवरच काम करते. या फेक साईटचे डिझाईन आणि पॅटर्न खऱ्या पेटीएम सारखेच वाटते, त्यामुळे युजरला खरी आणि खोटी साईट ओळखणेदेखील कठीण होते.

याशिवाय पैसे देण्याचे सांगून कोणी व्हॉट्सअपवर पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी सांगितला, तर सावध व्हा. हा फसवणुकीचा प्रकार असू शकतो. त्यावर विश्वास ठेऊ नका. सध्या व्हॉट्सअपद्वारे क्यूआर कोड पाठवून अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकारदेखील सातत्याने घडत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या