Thursday, April 25, 2024
Homeक्रीडापॉल अ‍ॅडम्स नव्हे 'ही' तर आपल्या नाशिकची माया; 'तिच्या' बॉलिंगची जगभरात होतेय...

पॉल अ‍ॅडम्स नव्हे ‘ही’ तर आपल्या नाशिकची माया; ‘तिच्या’ बॉलिंगची जगभरात होतेय चर्चा

मुंबई । Mumbai

नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणे (Maya Sonawane) हिची प्रतिष्ठेच्या टी २० चॅलेंजर ट्रॉफीसाठी (T20 Challenger Trophy) निवड झाली आहे.

- Advertisement -

नुकतेच या स्पर्धेत व्हेलॉसिटी विरूद्ध सुपरनोवाज (Velocity vs Supernovas) या संघात दुसरा सामना झाला. या सामन्यानंतर चर्चा रंगली आहे ती नाशिकच्या फिरकीपटू माया सोनवणेच्या बॉलिंगची.

व्हेलॉसिटीकडून खेळणाऱ्या मायाची बॉलिंग अ‍ॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी स्पिनर पॉल अ‍ॅडम्स (Paul Adams) आणि मागील मोसमातील संघ गुजरात लॉयन्सकडून (Gujarat Lions) आयपीएल खेळलेल्या शिविल कौशिक (Shivil Kaushik) यांच्या सारखी आहे.

हे दोघंही त्यांच्या विचित्र बॉलिंगच्या शैलीमुळे ओळखले जातात. त्यानंतर महिलांच्या क्रिकेटमध्ये माया सोनवणे (Maya Sonawane) हिच्याकडून ही शैली पहिल्यांदाच दिसली. त्यामुळे मायाची बॉलिंगअ‍ॅक्शन सोशल मीडियावर (Social media) चांगलीच व्हायरल झाली आहे.

टी २० चॅलेंज स्पर्धेत खेळणारी माया सोनवणे ही आठवी अनकॅप भारतीय खेळाडू (Indian players) बनली आहे. यापूर्वी तिने सिनिअर टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्या स्पर्धेतील ८ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मायाला टी-२० चॅलेंज स्पर्धेत कमाल करता आलेली नाही. तर व्हेलॉसिटीकडून (Velocity) खेळतांना मायाने २ ओव्हर्समध्ये १९ रन दिले असून तिला एकही विकेट मिळालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या