Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रुग्ण

औरंगाबादमध्ये आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा रुग्ण

औरंगाबाद – Aurangabad

(corona) कोरोनाची दुसरी लाट (second wave) ओसरलेली असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus variant) डोके वर काढले आहे. राज्यात आतापर्यंत 45 रुग्ण आढळले असून, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा औरंगाबाद व बीडमध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचे एनआयव्हीला पाठविलेल्या संशयितांच्या सॅम्पल तपासणीत रविवारी आढळून आले आहे.

- Advertisement -

राज्यात एकूण 45 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून जळगाव -13, रत्नागिरी -11, मुंबई -6, ठाणे- 5, पुणे -3 तर औरंगाबाद, बीड, पालघर, सिंधूदुर्ग, सांगली, कोल्हापूर,नंदूरबार या जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळल्याचे रविवारच्या अहवालात म्हटले आहे. औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे (घाटी) एनआयव्हीला सॅम्पल्स पाठविलेले आहेत.

या रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास, त्यांच्या आजाराचे स्वरुप, लसीकरण झालेले आहे का, आदी माहितीसह या रुग्णांच्या संपर्कातील कोणाला कोविड सदृश्य लक्षणे असल्यास त्यांचे नमुने घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या 45 रुग्णांपैकी 34 रुग्णांचीच माहिती आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेली असून, उर्वरित 11 रुग्णांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या