कमिन्स आयपीएलमधून बाहेर; अन्य खेळाडूंचा निर्णय सीए घेणार

कमिन्स आयपीएलमधून बाहेर; अन्य खेळाडूंचा निर्णय सीए घेणार

सिडनी | आयपीएल १४ चा उर्वरीत हंगाम यूएईत होणार आहे. हे जवळपास आता निश्चित झाले आहे. साधारणपणे हा हंगाम येत्या १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान यूएईत खेळवला जाण्याची शक्यता आहे.,..

मात्र, कोलकाता नाईट रायडर्स संघाला स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा तेज गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरीत हंगामातून माघार घेतली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा निर्णय आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने यूएईत आयपीएलच्या आयोजनाला परवानगी मिळवली आहे.

आयपीएलच्या १४ व्या पर्वातील उर्वरीत ३१ सामने अद्याप शिल्लक असून, अनेक लाख डॉलर्सचा आयपीएलचा करार आहे. इंग्लंडने आयपीएलच्या उर्वरीत हंगामात आपला एकही खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार नाही हे या पूर्वीच स्पष्ट केले आहे.

त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेचा विचार करता आपल्या संघातील खेळाडूंना जैविक सुरक्षित वातावरणात येणारा थकवा या सर्व गोष्टींचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला विचार करणे आवश्यक असणार आहे.

आयपीएल १४ चा हंगाम भारतात स्थगित झाल्यानंतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या मायदेशात मालदीवमार्गे परतावे लागले होते. मायदेशात परतल्यावर सर्व खेळाडू विलगीकरणात राहिले होते. बायो बबलमध्ये अधिक वेळ घालवणे खेळाडूंच्या हिताचे ठरणार का ? हा प्रश्न सीएसमोर निर्माण झाला आहे. आयपीएलच्या आयोजनाचा फायदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी किती योग्य आहे. हा निर्णय सीएला घ्यावा लागणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com