Friday, April 26, 2024
HomeUncategorizedश्रींच्या पालखी सोबत दिड लाखांच्यावर भाविकांचा सहभाग

श्रींच्या पालखी सोबत दिड लाखांच्यावर भाविकांचा सहभाग

दिपक सुरोसे

शेगाव – Shegaon

- Advertisement -

रजत नगरीतून संत नगरीकडे जाणाऱ्या श्रींच्या पालखीसोबत जवळपास दिड लांखाच्यावर भाविक सहभागी झाले होते. या भाविकांमुळे खामगाव ते शेगाव मार्ग अक्षरश फुलला होता. या वेळी भाविकांचे पहिले टोक संतनगरी (shegaon) शेगावात तर दूसरे टोक (Khamgaon) खामगावच्या सीमेवरील मानव धर्म केंद्राजवळ होते. पायदळ वारीत सहभागी झालेल्यांमध्ये युवती व महिलांची संख्या लक्षणीय होती.

पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणी कान करी तिर्थव्रत, या प्रमाणे धकाधकीच्या जीवनात पायीवारीने पंढरपूरला जाता येत नाही, याची खंत अनेकांना असते. याची उणीव भरून काढण्यासाठी खामगावसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून श्रींचे भक्त दरवर्षी खामगाव येथून शेगावला श्रींच्या पालखीसोबत पायी जातात. या पालखीत सहभागी झालेले असंख्य भाविक अनवाणी मार्गक्रमण करतात. श्री व विठ्ठल नामाचा जयजयकार करत शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखी व पायदळ वारीने ३ आँगष्ट रोजी पहाटे ५ च्या सुमारास खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान केले.

शेगाव आगाराकडून जादा बसेस

खामगाव येथून पायदळ दिंडीसोबत शेगावला जाणाऱ्या भाविकांची परत येण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी खामगाव व शेगाव आगाराने अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली. तसेच आज दुपारपर्यंत शेगाव ते खामगाव मार्ग पूर्णपणे बंद ठेवून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती.

या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे दर्शन घेतले.

दरम्यान, आज सकाळी पालखी शेगावकडे जात असताना वारकरी टाळकरी च पताकाधाऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी श्रींची प्रतिमा लावून समोर भव्य आरास केली होती. संत श्री गजानन महाराजांचा पालखी मार्गावर महिलांनी सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. यावेळी शहरातील सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने चहा, पाणी, केळी, दूध, फराळ व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. पायदळ दिंडी मार्गादरम्यान (police) पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या