आत्मविश्वास आणि प्रामाणिक कष्टाने समस्यांवर करा मात

आत्मविश्वास आणि प्रामाणिक कष्टाने समस्यांवर करा मात

महिला परिसंवादातील सूर

औरंगाबाद- Aurangabad

महिला (Women) म्हणून संधी नाकारणारे अनेक जण असतात. प्रत्येक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेची परिक्षा द्यावी लागते. हे सगळ करतांना आपल्यातील आत्मविश्वास (Confidence) सदैव जागृत ठेवण त्याला प्रामाणिक कष्टाची जोड देणे गरजेचे असते.

असा सुर अभाविपच्या तेजस्वीनी (Tejaswini) या राज्यस्तरीय विद्यार्थीनी परिषदेत आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला. या परिसंवादात अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री प्रेरणा पवार, सामाजिक कार्यकत्या सविता कुलकर्णी, डॉ.आरतीश्यामल जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष अनुराधा चव्हाण यांनी सहभाग घेतला.

हे सगळ करतांना आपल्यातील आत्मविश्वास सदैव जागृत ठेवण त्याला प्रामाणिक कष्टाची जोड देणे गरजेचे असते. असा सुर अभाविपच्या तेजस्वीनी (Tejaswini) या राज्यस्तरीय विद्यार्थीनी परिषदेत आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आला. या परिसंवादात अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री प्रेरणा पवार, सामाजिक कार्यकत्या सविता कुलकर्णी, डॉ. आरतीश्यामल जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष अनुराधा चव्हाण यांनी सहभाग घेतला.

गोविंदभाई श्रॉफ सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रारंभी प्रेरणा पवार यांनी अभाविपच्या माध्यमातून घेण्यात येणारे उपक्रम व त्यातून मिळणाऱ्या नैतृत्व कौशल्यावर भाष्य करत महिला सुरक्षा आणि संरक्षण याबाबत चालविण्यात येणाऱ्या मिशन साहसीची सविस्तर माहीती दिली. सविता कुलकर्णी यांनी कुटुंबाला प्राधान्य देऊन राष्ट्रहित महिलांनी कसे जोपासावे यावर विवेचन केले. जात, धर्म पंथ यापेक्षा राष्ट्र मोठे आहे. त्यामुळे या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या आपल्या मानून सोडवण्यासाठी प्र्राधान्य दिले जावे हे सांगताना त्यांनी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला.ज्या क्षेत्रात तुम्ही आहात तिथे प्रामाणिकपणे काम करा असा सल्लाही त्यांनी दिला.

डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी पत्रकारिता आणि महिलांविश्वावर आपली मते मांडली, ज्ञानाच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष असा भेद नसतो. आपली गुणवत्ता ज्ञानानेच सिद्द होत असते. अज्ञानावर केवळ ज्ञानच मात करु शकते. त्यामुळे सतत शिकण्याचा ध्यास धरा असे आवाहन त्यांनी करत भरपूर वाचन करण्याचा सल्ला दिला. महिला (Women) पत्रकारीतेत आल्या तर महिलांच्या समस्यांना मोठया प्रमाणात वाचा फुटेल. भगिनी भावाच्या माध्यमातून महिलां अधिक बोलतात ही महिलांची जमेची बाजू असते. त्याचा उपयोग समाजकारणातही होतो हे त्यांनी उदाहरणातून विद्यार्थींनीनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष अनुराधा चव्हाण यांनी राजकारण सुधारायचे असेल तर अभ्यासू महिलांनी स्वतहुन राजकारणात उतरण्याची गरज असल्याचे नमुद केले. राजकारणातील आरक्षणामुळे राजकारणात संधी असून महिलांच्या अत्याचाराला या माध्यमातून आळा घालता येऊ शकतो असे विचार त्यांनी मांडले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अरुणा म्हारोळकर यांनी केले. प्रारंभी उद्घाटन सत्र अभाविपच्या देवगिरी प्रदेश मंत्री अंकिता पवार यांच्या उपस्थित पार पडले.

परीषदेच्या यशस्वितेसाठी महानगर सहमंत्री ऋषीकेश केकान, महेश भवर, प्रभा जाधव, सोबिया शेख, रणजित खटके, महानगराध्यक्षा योगिता पाटिल, स्नेहा पारिक, ओमकार देवरे, गायत्री राऊत, माधुरी कुलकर्णी, श्रध्दा बारस्कर, प्रियंका खरात, महेश भवर, रंजिता खटके, ज्ञानेश्वर माने, अश्विनी वनारसे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com