बचतगटाच्या उत्पादनांसाठी 'सरस' प्रदर्शनाचे आयोजन

अजिंठा महोत्सवही होणार
बचतगटाच्या उत्पादनांसाठी 'सरस' प्रदर्शनाचे आयोजन

औरंगाबाद - aurangabad

ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत बचतगट समूहाच्या (Self help group) उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शन करणाऱ्या सरस प्रदर्शनाचे आयोजन मे महिन्यात अजिंठा (Ajanta) येथे होणार आहे. त्याच कालावधीमध्ये अजिंठा महोत्सवाचेही (Ajanta Festival) आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister of State Abdul Sattar) यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

(Divisional Commissioner's Office) विभागीय आयुक्त कार्यालयात सरस प्रदर्शन, अजिंठा महोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत राज्यमंत्री बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, (zp) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, नगराध्यक्ष समीर सत्तार, उपायुक्त जगदिश मणियार ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संगीता पाटील यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात सरस प्रदर्शन आणि अजिंठा महोत्सवाचे आयोजन केल्याने पर्यटनास चालना, स्थानिकांना रोजगार संधी आणि लेणीस व्यापक प्रसिद्धी मिळेल. त्या दृष्टीने हे दोन्ही उपक्रम मे महीन्यात अजिंठा येथे घेयायचे आहे. ते यशस्वीपणे राबविण्यासाठी महसूल, ग्राम विकास विभागाने सरस प्रदर्शनाचा तर पर्यटन आणि महसूल विभागाने अजिंठा महोत्सवाचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचीत करुन सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सव समिती स्थापन करून नियोजनात पोलिस, वैद्यकीय, नगरपालिका, अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण यासह इतर सर्व यंत्रणांच्या सहभागातून विविध संयोजन समित्या स्थापन कराव्यात.

याठिकाणी येणाऱ्या बचतगट समूहाच्या सदस्य, महोत्सवात सहभागी कलाकार, पर्यटक, प्रेक्षक या सर्वांच्या राहण्याची, जेवणाची, दळणवळणाची, सुरक्षा आणि इतर पूरक सुविधांची परिपूर्ण व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अधिक काटेकोरपणे सर्व नियोजन करून सरस प्रदर्शन आणि अजिंठा महोत्सव यशस्वी करण्याच्या सूचना राज्यमंत्री यांनी संबंधितांना दिल्या.

Related Stories

No stories found.