Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedआठ वारसास्थळांवर साजरा होणार जागतिक योग दिवस

आठ वारसास्थळांवर साजरा होणार जागतिक योग दिवस

औरंगाबाद – aurangabad

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि (World Yoga Day) जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे (Indian Archaeological Department) मंगळवारी (२६ जून) देशभरातील ७५ वारसास्थळी दिन साजरा केला जाणार आहे. त्यात औरंगाबाद विभागातील आठ स्थळांचा समावेश आहे. या आठ ठिकाणी दोन हजार २९० जण योग दिनात सहभागी होणार आहेत. औरंगाबाद विभागाचा मुख्य कार्यक्रम वेरुळ येथील कैलास लेणे परिसरात होणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाचे सहायक अधीक्षक डॉ. प्रशांत सोनवणे (Dr. Prashant Sonawane) यांनी दिली.

- Advertisement -

डॉ.प्रशांत सोनवणे म्हणाले, २१ जून या जागतिक योगदिनी (Ellora Caves) वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, (Ajanta Caves) अजिंठा लेणी, (Nashik) नाशिक येथील (Pandava Caves) पांडव लेणी, गोंदेश्वर मंदिर, नगर येथील सिद्धेश्‍वर मंदिर, सलाबत खाना कबर, दौलताबाद किल्ला याठिकाणी योग दिन साजरा केला जाणार आहे. वेरूळ येथील केलास लेणीच्या परिसरात पहाटे साडेपाच ते पावणे आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात सुमारे साडेसातशे नागरिक सहभागी होणार आहेत. त्यात केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक-विद्यार्थी, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे. भारतीय पर्यटन विभाग, एमटीडीसी, एन एस एस, हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी देखोल सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला कला महाविद्यालयाच्या प्राचार्य ममता राणी, भारतीय पर्यटन विभागाच्या मालती दत्ता, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, स्नेहल पाटील आदी उपस्थित होते.

असा असेल सहभाग

वेरूळ लेणी ७५०

दौलताबाद किल्ला ६००

बीबी का मकबरा ३५०

अजिंठा लेणी १००

पांडव लेणी (नाशिक) ३५०

गोंदेश्वर मंदिर (नाशिक) ४०

सिद्धेश्‍वर मंदिर (नगर) ५०

सलाबत खान कबर (नगर) ५०

- Advertisment -

ताज्या बातम्या