Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedराज्यमंत्री सत्तार यांच्या पोलिस चौकशीचे आदेश

राज्यमंत्री सत्तार यांच्या पोलिस चौकशीचे आदेश

औरंगाबाद – aurangabad

सिल्लोड-सोयगाव (Sillod-Soygaon) मतदारसंघाचे शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी (Minister of State Abdul Sattar Abdul Nabi) यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीत तफावत असल्याच्या तक्रारीची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सिल्लोडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी (Magistrate) दिले. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले.

- Advertisement -

अब्दुल सत्तार २००९ आणि २०१४ मध्ये (Congress) काँग्रेसकडून तर २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले. शिवसेना प्रणीत महाविकास आघाडी सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री आहेत. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याची तक्रार पुण्याचे डॉ.अभिषेक हरदास आणि सिल्लोडचे महेश शंकरपेल्ली यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सिल्लोडच्या न्यायालयात एका याचिकेद्वार केली. यावर १३ सुनावन्या झाल्या. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मिनाक्षी धनराज यांनी सीआरपीसीच्या कलम २०२ अंतर्गत सिल्लोड पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी २२ मार्चला आहे.

शपथपत्राची नोटरी शासन प्राधिकृत नोटरी अधिकारी अॅड. एस. के. ढाकरे यांनी केली. यातील माहिती बनावट व खोटी असल्याची जाणिव असतांना तसेच नोटरीचा परवाना नूतनीकरण केला नसतांना त्यांनी नोटरी केल्याने ते फसवणूकीच्या कटात सहभागी आहेत. यामुळे याचिकेत त्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणात सत्तार यांच्याविरूद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, सीआरपीसीच्या कलम २०० तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम १९९, २०० , ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

नेमके आरोप काय?

-२०१४ च्या शपथपत्रात मौजे दहेगाव येथील जमीन ५,०६,००० रूपयात खरेदी केल्याचे दाखवले. २०१९ मध्ये हा व्यवहार २,७६,२५० रूपयात दाखवला.

-२०१४ च्या शपथपत्रात सिल्लोडच्या सर्वे क्रमांक ९०/२ ची व्यावसायिक इमारत ४६,००० रूपयात खरेदी केली. २०१९ मध्ये याची खरेदी मूल्य २८,५०० दाखवले.

-२०१४ मध्ये निवासी इमारतीचे खरेदी मूल्य ४२,६६,००० रूपचे दाखवले. २०१९ मध्ये ही किंमत १० हजार रूपये आहे.

-२०१४ मध्ये सर्वे क्र. ३६४ मधील इमारत १६,५३,००० रूपपये दाखवली. २०१९ मध्ये याची किंमत १,६५,००० रूपये आहे.

-बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स, कंपन्या यातील गुंतवणूकीचा तपशील दिलेला नाही.

-गुन्हेगारी पार्श्वभूमी, प्रलंबीत व शिक्षित केलेल्या खटल्याची माहिती तसेच दिवानी वादा संदर्भातील माहिती दिलेली नाही.

कोण आहेत महेश शंकरपेल्ली

महेश शंकरपेल्ली व्यावसायिक आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. १९९७ मध्ये त्यांचे वडील व शिवसेना नगरसेवक शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सिल्लोड नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सत्तार यांचा एका मताने पराभव केला होता. २०१५ ते २०१८ पर्यंत महेश यांनी भाजपसाठी काम केले. २०१८ मध्ये आपकडून नगरसेवकाची निवडणूक लडवली. सद्या कोणत्याच पक्षात नाही. सत्तार यांचे मत जाणून घेण्यासाठी मेसेज केला, वॉट्सअॅपवर निरोप दिला. त्यांच्याकडून उत्तर आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या