Monday, April 29, 2024
HomeUncategorizedपोस्टात विमा एजंट बनण्याची संधी!

पोस्टात विमा एजंट बनण्याची संधी!

औरंगाबाद – aurangabad

दहावी पास (ssc) सुशिक्षित बेरोजगारांना डाक विभागाने (Department of Posts) व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलो आहे. डाक जीवन विमा (Life insurance), ग्रामीण डाक जीवन विमा एजंट (Insurance agent) होऊन बेरोजगारांना रोजगार मिळविता येणार आहे.

- Advertisement -

औरंगाबाद डाक विभागाच्या वतीने थेट मुलाखतीद्वारे विमा एजंटची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे असून, शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अथवा केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्यांचे माजी अभिकर्ते, स्वयंरोजगार वा उपरोक्‍त पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती आदी बाबी अर्जदाराला माहीत असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक आहे. ही सुरक्षा ठेव राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र स्वरूपात असेल, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परबाना देण्यात येईल, जो आरआरडीएचा परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवान्यामध्ये रूपांतरित केला जाईल. 

सर्व इच्छुकांनी अधीक्षक, डाकघर, जुना बाजार, औरंगाबाद यांच्या कार्यालयात जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारी मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकित प्रत आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र नमुन्यातील अर्जासह ९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अधीक्षक, डाकघर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या