Monday, April 29, 2024
HomeUncategorizedदोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेश

दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेश

औरंगाबाद – aurangabad

कोरोनाचा (corona) संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने 20 ऑक्टोबरपासून विद्यापीठ व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी सरकारने कडक नियमावलीचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे शासन निर्देशानुसार विद्यापीठ व महाविद्यालयात कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ऑफलाइन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जाणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग असतील.

- Advertisement -

कोरोनाने थैमान घातल्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुऴे शाळांबरोबरच विद्यापीठ व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार 20 ऑक्टोबरपासून विद्यापीठ व महाविद्यालये सुरू होतील. मात्र यासाठी राज्य सरकारने कडक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचे पालन देखील महाविद्यालयांना करावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना लस घेतली आहे. त्याच विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिकवणीसाठी महाविद्यालयात येण्याची परवानगी असेल. कोरोना लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय पूर्वीप्रमाणे ऑनलाइन शिकवणी सुरू ठेवणार आहे.

जे विद्यार्थी ऑफलाइन वर्गाला हजर राहतील, त्या विद्यार्थ्यांना मास्क वापरणे गरजेचे असणार आहे. या विद्यार्थ्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळणे अनिवार्य असेल. तसेच शिक्षक, प्राध्यापकांना देखील लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे. महाविद्यालय प्राध्यापकांकडून लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याचे प्रमाणपञ घेणार आहे. तसेच शिकवताना प्राध्यापकांना वर्गात फिरण्यास बंदी असणार आहे. त्यांना आपल्या जागेवरूनच विद्यार्थ्याना शिकवावे लागेल.

कोरोना लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या लीसकरण मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल. तसेच या लसीकरणाचा फायदा प्रशासनाला देखील होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या