औरंगाबाद मार्गावर धावत आहेत फक्त 11 रेल्वे

प्रवाशांची संख्या रोडावली
औरंगाबाद मार्गावर धावत आहेत फक्त 11 रेल्वे

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने राज्यभरात ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावले. यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षणीय घटली आहे. परिणामी, नंदीग्राम रेल्वे मंगळवारपासून रद्द केली आहे. आगामी काळात औरंगाबाद रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या 11 रेल्वेपैकी काही रेल्वे बंद पडण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून ब्रेक दि चेनच्या कडक निर्बंधाची घोषणा करण्यापुर्वी रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत होती. यात साई दर्शनासाठी येणार्‍या रेल्वेपासून ते तिरूपती दर्शनासाठी नियोजित रेल्वे सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र कोरोना रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करत नंतर लॉकडाऊनही लावले. यामुळे चेन्नई- नगरसोल, साई नगर -शिर्डी, काकीनाडा, विजयवाडा आणि अन्य काही रेल्वे सेवा रद्द करण्यात आलेली आहे. तसेच मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमीअसल्याकारणाने जालना-औरंगाबाद-सीएसटी जनशताब्दी एक्सप्रेसही रद्द केलेली आहे. सध्या औरंगाबाद रेल्वे मार्गावर नियमित 11 रेल्वे धावत आहेत. यात मुंबईसाठी राज्यराणी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस या तीन रेल्वे धावत आहेत. तर हैदराबादसाठी अजिंठा एक्सप्रेस, औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस (पूर्वीची पॅसेंजर), हैदराबाद जयपूर एक्सप्रेस (दर आठवडी) या रेल्वे सुरू आहे.

दिल्लीसाठी सचखंड ही नियमित रेल्वे सुरू असून आठवड्यातून एकदा जाणारी मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही रेल्वे सुरू आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस सध्या सुरू आहे. या रेल्वेलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहेत. त्यामुळे या रेल्वेही आगामी काळात रद्द होण्याची शक्यता आहे. पूर्वीची मुंबई नागपूर नंदिग्राम एक्सप्रेस सध्या नांदेडपर्यंतच धावत आहे. या रेल्वेला प्रवाशी मिळत नसल्याने ही रेलवे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. मंगळवारपासून ते पुढील आदेशापर्यंत ही रेल्वे बंद केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com