ऑनलाईन फसवणूक ; मागवले ब्रँडेड हेडफोन अन्‌ निघाले...

ऑनलाईन फसवणूक  ; मागवले ब्रँडेड हेडफोन अन्‌ निघाले...
Sandip Tirthpurikar

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


इन्स्टाग्रामवरील (Instagram) जाहिरातीला भुरळून हेडफोन (headphones) खरेदी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. दोन हजार रुपयांचा हेडफोन हजार रुपयांत घ्या, अशी जाहिरात पाहून तरुणाने कुठलाही विचार न करता थेट ऑर्डर दिली. मात्र, पार्सलमध्ये अवघ्या ५० रुपयांची घड्याळ निघाली. त्यामुळे ऑनलाइन खरेदी (Online shopping) करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

ऑनलाईन फसवणूक  ; मागवले ब्रँडेड हेडफोन अन्‌ निघाले...
VISUAL STORY मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री...!

रामविजय घोरपडे (रा. विजयनगर चौक, गारखेडा परिसर) असे या फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मेडिकल एजन्सीमध्ये काम करतो. सोशल मीडियावर असणारा राम २८ एप्रिल रोजी इन्स्टाग्राम पोस्ट चाळत होता. तेव्हा त्याला वन प्लसचे दोन हजार रुपयांचे हेडफोन ५० टक्के सवलतीत अवघ्या हजार रुपयात ऑनलाइन खरेदी करा, अशी जाहिरात दिसली. या फसव्या जाहिरात असतात, असा साधा विचारही त्याच्या डोक्यात आला नाही. हेडफोनची गरज असल्यामुळे तो काही दिवसांपासून हेडफोन खरेदी करण्याच्या विचारात होता. त्यात ही जाहिरात दिसली. तसेच या जाहिरातीत अबघ्या सहा मिनिटांचा अवधी दिला होता.

ऑनलाईन फसवणूक  ; मागवले ब्रँडेड हेडफोन अन्‌ निघाले...
prajakta mali प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज...

त्या वेळेत ऑर्डर दिली तरच आपल्याला हेडफोन हजार रुपयात भेटतील, असा विचार करून रामने जाहिरात खरी की फसवी याची खात्री न करता हेडफोनची ऑर्डर दिली. त्यानंतर त्याला एक फोन आला. त्याने नाव, पत्ता विचारून खात्री करीत ५ मेपर्यंत पार्सल घरपोच येईल, असे कळवले. राम पार्सलची वाट पाहात असतानाच ३ मे रोजी त्याला पार्सल बॉयचा फोन आला. त्याने पार्सल असल्याचे सांगितल्यावर राम कामानिमित्त बाहेर असल्याने त्याने एका मित्राला ते पार्सल घेण्यास सांगितले. मित्राने घरी बोलावले असता पार्सल बॉय विजयनगर चौकात बोलावून पार्सल हातात टेकविले अन्‌ फोन पेवरून पैसे घेऊन निघून गेला.

९० टक्के सवलतीत नेमके कसे हेडफोन मिळाले ? या उत्सुकतेतून रामच्या मित्राने घरी जाताच आधी पार्सल उघडले. त्यानंतर मात्र त्याला धक्का बसला. पार्सलमध्ये जास्त प्रमाणात कागद निघाले. त्यात बाजारात ५० ते ६० रुपयांना मिळणारे एक साधे घड्याळ त्यांच्या हाती पडले. हेडफोनचा तर पत्ताही नव्हता. त्यानंतर मित्राने हा प्रकार रामला कळवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com