Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांची संख्या ६५ टक्के!

ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांची संख्या ६५ टक्के!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे. सद्यस्थितीत दरमहा सरासरी ९ कोटी १० लाख वीज ग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. ऑनलाईन पेमेंट केल्याने ग्राहकांना आकर्षक सूट देखील मिळत आहे. 

- Advertisement -

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाईनद्वारे घरबसल्या ब २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी वेबसाईट व महावितरण मोबाईल ऍप उपलब्ध आहे. महावितरणचे उच्चदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत असून महावितरणच्या उच्चदाब व लघुदाबाच्या १ कोटी १० लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल ५ हजार ७५० कोटी रकमेचा ऑनलाईनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये पुणे परिमंडळातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाखांचा वीजबिलांचा भरणा केला आहे. त्यानंतर कल्याण परिमंडळातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी तर भांडूप परिमंडळामध्ये १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाखांच्या बिलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. बारामती १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९. ३५ कोटी तर नाशिक १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

‘ऑनलाईन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यायाद्वारे ऑनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७च्या तरतुदी लागू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या