Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकांद्याची आवक वाढल्याने भाव घसरला 

कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरला 

औरंगाबाद – aurangabad

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) भाज्या तसेच कडधान्याची आवक मुबलक प्रमाणात होत असली तरी मागील आठ दिवसांपासून उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे नागरिक बेहाल झाले असून त्यामुळे टरबुज, खरबुज यासारख्या पाणीयुक्त फळांची आवक वाढलेली दिसत आहे.

- Advertisement -

गुरुवारी समितीत धान्य व भाजीपाल्याची आवक मुबलक प्रमाणात झाल्याचे कृउबाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी उन्हाळी (Onion) कांद्यांचे उत्पादनही चांगले झाले असल्याने समितीत कांदूयांची आवकही वाढली आहे. गुरुवारी २ हजार १४५ क्विंटल एकूण आवक झाली असून भावात मात्र कमालीची घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे.

सध्या कांद्याला केवळ १५० ते ८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळताना दिसून आला. तर किरकोळ बाजारातही कांद्याची विक्री केवळ १० ते १५ रुपये प्रति किलोने होत आहे. धान्यात गव्हीची आवकही १४१ क्विंटल झाल्याने त्याला २ हजार १०० ते २ हजार ४५० चा भाव साठवणूक करणाऱ्या नागरिकांना गहू खरेदीसाठी अधिकचे लागत असल्याचे यावेळी कृउबाकडून सांगण्यात आले. तर सध्या उन्हाचा पारा बाढलेला असल्याने नागरिक टरबुज, खरबुजांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात टरबुज, खरबुजांची आवक वाढली असून टरबुजांची १४५ क्विंटल आवक झाली. यावेळी टरबुजाला प्रति विविंटल ५०० ते ६०० रुपयांचा भाव मिळाला.

दरम्यान, कडाक्याच्या उन्हाळ्यात शीतपेयात लिंबाचा वापर वाढत असला तरी हा लिंबू सध्या सामांन्यांच्या खिशाला परवडेनासा झाला आहे. समितीत लिंबाची आवक केवळ २२ विववंटल झालेली असून प्रति क्विंटल लिंबाला ३ हजार ते ५ हजारांचा भाव मिळाला आहे. तर किरकोळ बाजारात एका लिंबासाठी नागरिकांना १० ते १५ रुपये मोजावे लागत असल्याने रोजच्या जेवणात लिंबू नाहिसा झाला आहे. तर शितपेय विक्रेत्यांनाही लिंबाचा वापर करतांना विचार करावा लागत आहे. अनेक उपहारगृहांतूनही लिंबू वगळले जात असल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या