...आणि त्याने प्रेयसीचेच घर फोडले! 

...आणि त्याने प्रेयसीचेच घर फोडले! 

एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

औरंगाबाद - aurangabad

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकरानेच प्रेयसीचे घर लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी आरोपी प्रियकर सिकदंर खान अकबर खान (२१, रा.निजामगंज कॉलनी, भवानी नगर) याला अटक केली.

पोलिसांनी आरोपी तरुणाच्या ताब्यातून लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे यांनी दिली आहे. न्यू बायजीपुरा भागातील ३५ वर्षीय महिलेचे २१ वर्षीय सिकंदर याच्यासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, महिलेने सिकंदरकडे लग्नासाठी तगादा लावला. त्यामुळे वैतागलेल्या सिकंदरने प्रेयसीच्या घरावरच डल्ला मारून ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार उघडकीस आला होता. त्यावरून जिन्सी पोलिसांनी सिकंदरला अटक केली.

पोलीस कोठडीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सिकंदरकडून चोरलेले सोन्या- चांदीचे दागिने व अन्य असा ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यकंटेश केद्रे, विशेष पथकाचे उपनिरीक्षक गोकुळ. एल. ठाकुर, सहायक फौजदार संपत राठोड, पोलीस नाईक नंदुसिंग परदेशी, शिपाई संतोष बमनाथ, सुनील जाधव, नंदलाल चव्हाण यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com