डिझेलचे दरात ‘शतक’ करणारी राज्यात दोन शहरे

अमरावतीनंतर औरंगाबादचा नंबर
डिझेलचे दरात ‘शतक’ करणारी राज्यात दोन शहरे

औरंगाबाद - Aurangabad

शहरात (Petrol) पेट्रोलच्या दराने १५ मे रोजी भाववाढीचा शंभर रूपयांचा आकडा पार केला होता. पेट्रोल दरवाढीच्या शतकाच्या तब्बल १४३ दिवसानंतर शहरात (Diesel) डिझेलच्या दरानेही शतक गाठले. शहरात डिझेल १०० रूपये ०९ पैसे रूपये प्रति लिटर दराने विकण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नियमित वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे ही वाढ होत असल्याची माहिती पंप विक्रेत्यांकडून देण्यात येत आहे. डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून नियमित वाढ होत आहे. सहा सप्टेंबर रोजी ९७.५२ रूपये डिझेलचे दर होते. हे दर ६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात स्थिर राहिले होते. तत्पुर्वी १६ जुलै ते ५ सप्टेंबर या काळात वेळोवेळी डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. या काळात ४२ पैसे, २०, ११, १६, १७ आणि १७ पैसे असे दर कमी करण्यात आले होते. १५ जुलै रोजी डिझेलचे दर ९८.७५ पैसे इतके होते.

डिझेलचे दर कमी झाल्यामुळे तसेच दर स्थिर असल्यामुळे ट्रान्सपोर्ट चालक आणि इतर व्यावसायिकांची चिंता कमी झाली होती. मात्र, २३ सप्टेबर ते ५ ऑक्टोबर या काळात डिझेलच्या दरात २०, २६, २५,२६, ३२, ३२, ३२, ३२ पैशांची वाढ झालेली आहे. गेल्या तेरा दिवसात डिझेलचे दर २ रूपये ५७ पैशांनी वाढले आहे. ही लक्षणिय भाववाढीमुळे शहरात डिझेलचे दर हे १००. ०९ पैसे प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात ही दरवाढ अजून काही दिवस राहणार असल्याची माहिती पंप चालकांकडून देण्यात येत आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विचार केल्यास राज्यात पेट्रोलच्या भाववाढीबाबत परभणीत सर्वांत महाग पेट्रोल खरेदी केले जाते. डिझेल दराबाबत विचार केल्यास राज्यात अमरावती हे शहर सध्या सर्वात महाग डिझेल विक्री करणारे शहर ठरले आहे. अमरावतीमध्ये डिझेलचे दर प्रतिलिटर १०० रूपये ३० पैसे आहे. तर अमरावतीनंतर औरंगाबाद शहर महाग डिझेल विक्री करणारे दुसरे शहर ठरले आहे. आगामी काळात शंभरी डिझेल असलेल्या शहरांमध्ये परभणी आणि नांदेड या दोन शहराचा क्रमांकही दरवाढीत कायम असल्यास लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com