राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के 'अनलॉक'

राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के 'अनलॉक'

चाचपणी सुरू

औरंगाबाद Aurangabad

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने (Corona) देशातील नागरिकांना हैराण केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव (Outbreak) कमी होताना दिसत आहे. राज्य कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत (restrictions) पुर्नविचार (Reconsideration) करू शकता आणि अनावश्यक निर्बंध दूर करून दिलासा देऊ शकतात, याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव (Union Health Secretary) राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे. त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मात्र, टास्क फोर्सने (Task Force) सावध पवित्रा घेताना सध्या काही प्रमाणात रुग्णवाढ होत असल्याने मार्च 2022 नंतर अनलॉक (Unlock) होणार आहे.

राज्यात मार्चनंतरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट (third wave) आटोक्यात आल्यानंतरही दररोज शेकडो रूग्णांची (patients) नोंद होत आहे. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सनं सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मास्क मुक्तीचा (Mask Liberation) निर्णयही मार्चनंतरच होणार आहे.

ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा (Delta Krone) नवीन व्हेरियंट आढळला आहे. यामुळे अजून थोडावेळ अनलॉक करण्यासाठी घेतला जाणार आहे. कोरोना निर्बंधात शिथिलता आणण्याच्या सूचना राज्यांना केंद्र सरकारने केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com