Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसावधान ; कोरोनाची चौथी लाट येण्याच्या मार्गावर!

सावधान ; कोरोनाची चौथी लाट येण्याच्या मार्गावर!

औरंगाबाद – aurangabad

जूनअखेर (corona) कोरोनाचा संसर्गपसरण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी आधीच वर्तवलेली आहे. त्यानुसार औरंगाबाद शहरात आता कोरोना संसर्गाची साखळी पसरू लागली आहे. मागील आठवडाभरापासून रोजचे पाच ते दहा रुग्ण निघत होते. मात्र गुरूवारी शहरात १७ रुग्ण पॉझिटिव्ह (Patient positive) निघाले. ही शहरासाठी धोक्याची घंटा असून सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मागील काही दिवसांपासून मास्कसह (Social distance) सोशल डिस्टन्सिंगचे पुन्हा एकदा पालन करावे, असे आवाहन (Municipal Corporation) महापालिकडून केले जात आहे.

- Advertisement -

आरोग्य तज्ज्ञांनी जूनअखेरनंतर कोरोनाची चौथी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तो आता वाढत्या रुणसंख्येमुळे खरा ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर भागात कोरोना रुग्ण वाढू लागले आहे. त्यापाठोपाठ आता औरंगाबाद शहरातही कोरोना रुग्णाची रोजची संख्या वाढताना दिसत आहे. २३ जून रोजी मागील चोवीस तासांत शहरात १७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित निघाले. यामुळे आता शहरातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. तर ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ही ६ आहे. यामुळे आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ७१ एवढी आहे. संसर्गाची साखळी वाढत गेल्यास चौथी लाट निश्‍चित मानली जात आहे.

५९ रुग्ण घेताहेत घरीच उपचार

शहरातील एकूण बाधितांपैकी ५९ रुग्ण हे सौम्य लक्षणे असल्यामुळे घरीच उपचार घेत आहेत. तर घाटी रुग्णालयात चार जणांवर उपचार सुरू असून यापैकी 3 जण गुरूवारीच उपचारासाठी दाखल झाले आहेत. एक रुग्ण खासगी रुग्णालयात तर एक रुग्ण महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पालिकेने दिलेल्या कोरोना अहवालात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या