विलासरावांनी केलेल्या इमारतीचे उद्धव ठाकरे करणार दुसऱ्यांदा भूमिपूजन

२००१ मध्ये विलासरांवानी केली होती पूजा
 विलासरावांनी केलेल्या इमारतीचे
  उद्धव ठाकरे करणार दुसऱ्यांदा भूमिपूजन

औरंगाबाद- Aurangabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) शुक्रवारी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Chief Minister Vilasrao Deshmukh) यांनी २० वर्षापूर्वी कोनशीला रचलेल्या जिल्हा परिषदेच्या(Zilla Parishad) नवीन इमारतीची (new building) दुसऱ्यांदा कोनशीला (Cornerstone) रचणार आहेत. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी या कामासाठी मोठी मेहनत घेत अनेक मंजुऱ्या आणल्या. मात्र, त्यानंतर आलेल्या कार्यकारिणीने जुना ठराव रद्द केला अन् २० वर्षे काम रखडले. आता उद्धव जुन्या भूमिपूजनाच्या कामावर रेखोट्या ओढणार आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहनासाठी शुक्रवारी शहरात येणारे मुख्यमंत्री ठाकरे जिल्हा परिदषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन समाविष्ट आहे. मात्र, २० वर्षानंतर त्याच इमारतीच्या भूमिपूजनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ काळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जागेसाठी झाला संघर्ष


१९७६ पासून जिपची सद्याची इमारत शिक्षण खात्याच्या ओरिएंटल हायस्कूलमध्ये आहे. नोेव्हेंबर १९९९ ते मार्च २००२ दरम्यान जिप अध्यक्ष असणारे हरश्चिंद्र लघाने पाटील नवीन इमारतीसाठी जागेचा शोध सुरू केला. आमखास मैदान व न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा विचार झाला. नंतर ओरिएंटल शाळेची ३.७५ एकर आणि कन्या प्रशालेची ६.५२ एकर अशा १०.२७ एकर जागेवर एकमत झाले.

तत्कालीन शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे जमीन हस्तांतरण्याच्या विरोधात होते. मात्र, विलासराव देेशमुख यांच्या मध्यस्थीने ती जिल्हा परिषदेच्या नावावर हस्तांतरीत करून घेतल्याची माहिती माजी जिप अध्यक्ष आणि तत्कालीन सदस्य रंगनाथ काळे यांनी दिली.


विलासरांवांनी केले भूमिपूजन


विलासराव देशमुख यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २००१ रोेजी नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमाला तत्कालीन पालकमंत्री पद्मसिंह पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील, अशोक चव्हाण, चंद्रकांत खैरे, राजेंद्र दर्डा, महापौर डॉ.भागवत कराड यांची उपस्थिती होती. २००२ मध्ये लघाने यांच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला आणि नवीन कार्यकारिणीने जुना ठरावच रद्द केल्याचे रंगनाथ काळे म्हणाले.

काँग्रेस सत्तेत, भूमिपूजन शिवसेनेकडून


२० वर्षापूर्वी भूमिपूजन झाले त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती. दोन दशकानंतर आता काँग्रेसच्या मीरा शेळके अध्यक्ष अाहेत. त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याने केलेले भूमिपूजन आता शिवसेनेचे मुख्यमंत्री करणार आहेत.

आर्किटेक्टने वसूल केली नुकसान भरपाई


इमारतीच्या कामासाठी पुण्याच्या नवनिर्माण डेव्हलपमेंट कन्सलटेंट यांची निवड केली होती. मात्र, काम रद्द झाल्याने आर्किटेक्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. येेथे जिपचा पराभव झाला. जिपने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे तडजोडीतून नुकसान भरपाई म्हणून आर्किटेक्टने ५० लाख रूपये वसूल केले.

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करावे एका मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वास्तूचे दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करावे, हे सामान्य संकेत आहेत. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे २० वर्षानंतर त्याच इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने ही बाब मुख्यमंत्र्यांना कळवायला हवी होती. मात्र, तसे झाल्याचे दिसत नाही.
-रंगनाथ काळे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com