Monday, April 29, 2024
HomeUncategorizedवर्ल्डकपमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया'ऐवजी 'भारत'; भारताच्या 'या' खेळाडूने केली मागणी

वर्ल्डकपमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’; भारताच्या ‘या’ खेळाडूने केली मागणी

मुंबई | Mumbai

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने बीसीसीआयकडे अजब मागणी केली आहे. विरेंद्रे सेहवागने बसीसीआय सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे अपील केले आहे. त्याने केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. पुढच्याच महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचं नाव बदलले जावे असे सेहवगाने म्हटले आहे.

- Advertisement -

सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे की, स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावे. ट्विटमध्ये सेहवागने पुढे म्हटलेय की, मला नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की ते आपल्यामध्ये अभिमान जागृत करेल.

आपण भारतीय आहोत आणि इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिले आहे. आपले मूळ नाव ‘भारत’ परत मिळण्यास बराच काळ लागला आहे. मी बीसीसीआय आणि जय शहा यांना विनंती कतो की, विश्वचषकात भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ लिहावे.

आज बीसीसीआयने विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयच्या ट्विटला रिपोस्ट करत सेहवाग म्हणाला की, आता टीम इंडिया नाही, टीम भारत. विश्वचषकात आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डूचा जयजयकार करतो. जसा आपल्या हृदयात भारत आहे, तसाच आपल्या खेळाडूंच्या जर्सीवरही यावा. या ट्विटमध्येही सेगवागने जय शहांना टॅग केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या