Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedडॉक्टर महिलेकडून रुग्णाच्या पतीला 'अश्लिल मेसेज'!

डॉक्टर महिलेकडून रुग्णाच्या पतीला ‘अश्लिल मेसेज’!

औरंगाबाद – aurangabad

रुग्णालयात (Hospital) येणार्‍या महिला रुग्णासोबत पतीचे संबंध असल्याच्या संशयावरून महिला डॉक्टरने (Doctor) रुग्णाच्या पतीला अश्लिल मेसेज पाठवले. त्यासाठी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावाने नवीन सिमकार्ड खरेदी केले. मेसेज पाहून घाबरलेली रुग्ण महिला व तिच्या पतीने थेट (police) पोलिसांकडे तक्रार दिली. प्रकरण पोलिसांपर्यंत जाताच महिला डॉक्टरने (mobail) मोबाइल बंद करून (SIM card) सिमकार्ड टॉयलेटमध्ये फ्लश केले. तोपर्यंत उस्मानपुरा पोलिस तिच्यापर्यंत पोहोचले होते. यात कर्मचारी परशुराम वाहुळे याला अटक केली असून त्या महिला डॉक्टर यांना नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

२६ वर्षीय तक्रारदार महिला मूळ नगर जिल्ह्यातील आहे. ती सध्या पतीसह उस्मानपुरा परिसरात वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या पतीच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून अश्लिल मेसेज प्रात झाले. त्यात महिलेविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य होते. त्यामुळे महिलेसह पतीला धक्का बसला. मात्र, काही वेळातच महिलेच्या भावाच्या क्रमांकावरदेखील तसाच मेसेज प्राप्त झाला. कोणीतरी आपल्याला समाजात व्हायरल करत असल्याने घाबरलेल्या पती व पत्नीने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक गीता बागवडे या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

तपासात सिम कार्ड परशुराम वाहुळेच्या नावावर असल्याचे समोर आले. त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत वारंवार प्रश्‍न करूनही तो तोंड उघडत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला गुन्ह्याचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर त्याने तो काम करत असलेल्या ठिकाणी महिला डॉक्टर यांनी त्याच्या नावाने सिमकार्ड घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. सदर डॉक्टर व व पती जनरेशन नेक्स्ट आयव्हीएफ सेंटर चालवतात. तक्रारदार महिला काही महिन्यांपासून त्यांच्याकडे उपचारासाठी जाते. मात्र, तक्रारदाराचे व डॉ.राजेंद्र यांचे संबंध असल्याचा संशय महिला डॉक्टर यांना आला. त्या संतापातून त्यांनी परशुरामला सिम कार्ड आणून देण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णालयातून महिलेच्या पती व भावाला मेसेज पाठवले. पोलिसांनी तत्काळ त्यांचा आयफोन जप्त केला. मात्र, सिमकार्ड टॉयलेटमध्ये फ्लश केले होते. सायंकाळी उशिरा हा प्रकार समोर आल्याने महिला डॉक्टरला नोटीस देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या