पाण्याच्या स्त्रोतांची वस्तुनिष्ठ पाहणी करा

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
पाण्याच्या स्त्रोतांची वस्तुनिष्ठ पाहणी करा

औरंगाबाद - aurangabad

जल जीवन मिशन अंतर्गत 55 लिटर पाणी प्रत्येक घरी पोहचवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. यासाठी पहिल्या टप्यातील 324 गावांची कामे लवकरच मंजूर होणार आहेत. पाण्याच्या स्त्रोतांची पहाणी करून 10 वर्षांपासून स्रोत कुठल्या महिन्यात कोरडा पडला होता यांची माहिती घेऊन विश्लेषण अहवाल तयार करावा. तसेच गावातल्या लोकांशी संवाद साधून गावातील पाण्याच्या स्त्रोतांची माहिती घेऊन नोंदणी करण्याचे निर्देश (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

संबंधित कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सर्व उपअभियंता, तहसीलदार,बीडीओ, व संबंधित अधिकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.