शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी समन्वयाने काम करा-जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी 
समन्वयाने काम करा-जिल्हाधिकारी

औरंगाबाद - aurangabad

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा होणे आवश्यक आहे. शेतकरी व लाभार्थ्यांना मदत मिळावी यासाठी बँक व महसूल प्रशासनाने समन्वयाने जाणिव जागृती करावी तसेच पीककर्ज परतफेड व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रस्ताव बँकांनी प्राधान्याने मंजूर करुन कृषी अधारित जोड व्यवसाय आणि इतर योजनांसाठी प्राप्त कर्ज प्रस्तावातील त्रूटीची कालबद्ध पद्धतीने पूर्तता करुन कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बँक समिती सदस्य व विविध विभागाच्या विभागप्रमखांची अर्धवार्षिक आढावा बैठक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी जिल्ह्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या योजना, यासाठी दिला जाणारा कर्ज पुरवठा, विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची लक्षांकपूर्ती याबाबतचा आढावा समिती समोर सादर केला. यामध्ये संपूर्ण वित्तीय समावेशन, अटल पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जपूरवठा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इतर मागास प्रवर्ग महामंडळ, महिला आर्थिक महामंडळ यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, आत्मा या विभागातील विविध लाभाच्या योजनाच्या प्रकरणातील कर्ज देण्याबाबतचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्रूटीची पूर्तता करुन स्वीकृत करावेत, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्हयातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भरपाईसाठी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदानाची मागणी शासनाकडे पाठवली असून ती प्राप्त होताच शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय नियोजन अधिकारी महेश डांगे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, भारतीय रिझर्व बँकेचे सुरेश पटवेलकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक इम्रान खान यांच्यासह संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे कार्यलाय प्रमुख तसेच विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ज्या तालुक्यात पीककर्ज परतफेडीचे प्रमाण अत्यल्प आहे अशा तालुक्यात महसुल प्रशासन व संबंधित बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयातून जाणिव जागृतीचे उपक्रम राबवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com