दिलासादायक : औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात

व्हेंटीलेटर जिल्ह्याच्या बाहेर न देण्याच्या सूचना
दिलासादायक : औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात

औरंगाबाद - Aurangabad

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे, असा दावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आढावा बैठकीत केला. यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्व अधिकार्‍यांनी दक्ष राहून काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांसंदर्भात लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी खा.डॉ.भागवत कराड, खा.इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, अतुल सावे, उदयसिंह राजपूत, हरीभाऊ बागडे यांच्यासह महापालिका आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोगय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वाढले असून कोरोना बाधितांची संख्या देखील नियंत्रणात आणण्यात आल्याचा दावा केला. यात प्रशासनासह सर्व नागरिकांचा, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. तरी यापुढील काळात ही अशीच शिस्त कायम ठेवण्यास नक्कीच कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीशी आपण सामना करु शकू, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. आयुक्‍त पांडेय यांनी रोज शहरात 5000 टेस्टींग होत असून शहरात कॉन्टेक्ट ट्रेसींग देखील नियमित होत आहे.

भविष्यातील तिसर्‍या लाटेकरीता प्रशासन तयारीत असून त्याचाच एक भाग म्हणून पालिका डॉक्टरांना आयसीयुमध्ये वापरात येणार्‍या विविध यंत्राचा वापर कसा करावा यासाठी, या डॉक्टरांना घाटीमध्ये प्रशिक्षणाकरीता पाठवण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. खा. डॉ. कराड म्हणाले की शहरातील अतिरिक्त व्हेंटीलेटरचा उपयोग हा घाटीमधील व्हेटींलेटर बेड वाढवण्याकरिता करावा, असे सूचवले.

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजनसाठा उपलब्ध आहे. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सीजन साठा वाढविण्यात येत आहे.

ऑक्सीजन उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण आदी ग्रामीण भागातही ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. या प्रकल्पासाठी 6 कोटी 60 लाख इतक्या निधीला मान्यता देखील मिळाली आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे काम सीएसआरमधून चालू केले असूरन या प्रकल्पातून एकूण 11 किलो इतक्या ऑक्सीजन सिलेंडरची निर्मिती होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

व्हेंटीलेटर जिल्ह्याच्या बाहेर देऊ नका

दिवसेंदिवस रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढत असून प्रत्येक रुग्णालयात नियमित आगप्रतिबंधात्मक उपाययोजनांची तपासणी करण्याचे खा. जलील यांनी सूचित केले. उदयसिंह राजपूत यांनी कन्नडमध्ये एम.डी फिजीशीयन डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा, असे सूचवले. सीएसआर फंडातून घाटीला देण्यात आलेले व्हेंटीलेटर कार्यान्वित करण्यात आले का? शहरात होत असलेले कॉन्टॅक्ट ट्रेसींग, चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनची दुरुस्ती लवकरात लवकर करावी असे, असे आ. अतुल सावे यांनी सूचित केले.

बागडे यांनी आमदार निधीतून अ‍ॅम्ब्युलन्स घेऊ इच्छित असल्याचे सांगितले. शहरात उपलब्ध असलेले व्हेंटीलेटर मराठवाड्याच्या तसेच जिल्ह्याच्या बाहेर न देता आपल्या जिल्ह्याची गरज पूर्ण करण्याचे सर्व आमदारांच्या वतीने सूचित करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com