आता अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी लगद्याच्या विटांचा वापर

लवकरच निविदा काढली जाणार
आता अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी लगद्याच्या विटांचा वापर

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना संसर्गकाळामुळे शहरातील जवळपास सगळ्याच स्मशानभूमींवर चितांसाठी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर सुरू असतानाच लाकूड मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करायला लागत आहेत. त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी लाकडांच्या ऐवजी लगद्याच्या विटांचा वापर केला जाणार आहे.  

मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी शहरातील स्मशानभुमींमध्ये लाकडांचाच अधिक वापर केला जात आहे. त्यासाठी मोठ्या झाडांवर कुर्‍हाड चालवली जात आहे. त्यामुळे पर्यावरणावरचा र्‍हास होत असून वाढत्या प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर थांबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापुढे लगद्यापासून तयार होणार्‍या विटांचा वापर केला जाणार आहे. या विटांच्या खरेदीसाठी लवकरच काढली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंदू धर्माच्या पंरपरेनुसार मृतदेहाला अग्निडाग दिला जातो. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र यासाठी झाडांची कत्तल करून लाकडे आणली जातात. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असून प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त पांडेय यांनी लाकडाचा वापर थांबविण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था म्हणून लगद्यापासून तयार होणार्‍या विटांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात 16 स्मशानभुमीमध्ये मृतदेहावर अंतीम संस्कार केले जातात. त्यासाठी लाकडांचा वापर होत आहे. सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बाहेरच्या जिल्हयातील व बाहेरच्या गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यींच्यावर शहरातील स्मशानभुमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे लाकडांचा वापरही वाढलेला आहे. लाकडाचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी लगद्यापासून किंवा ऊस, सोयाबीन यापासून तयार होणार्‍या विटांचा (ब्रिक्वेटस) वापर केला जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा काढण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाकडांसाठी होणारी बेसुमार वृक्षतोड थांबविण्याच्या दृष्टीने पालिकेने लाकडाच्या वापराऐवजी लगद्यापासून तयार होणार्‍या विटांचा उपयोग अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. विटांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com