Monday, April 29, 2024
HomeUncategorizedआता 'लोडिंग-अनलोडिंग'ची जबाबदारी दुकानदाराची!

आता ‘लोडिंग-अनलोडिंग’ची जबाबदारी दुकानदाराची!

औरंगाबाद – Aurangabad

राज्यातील विविध शहरांप्रमाणे मालवाहतुकीची जबाबदार असलेले मालवाहतूकदार संबंधित दुकानदार किंवा कंपनी माल त्यांच्या परिसरात आणून देतील. या ट्रकमधून माल अनलोड किंवा लोडिंग करण्याची जबाबदारी संबंधित दुकानदार किंवा कंपनीची असणार आहे. औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (Transport Association) शहरात एक ऑगस्टपासून ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती औरंगाबाद ट्रान्स्पोर्ट असोसिएशनकडून जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान, सीनिअर उपाध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, सचिव जयकुमार थानवी तसेच अन्य ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबत चर्चा करण्यात आली. या अध्यादेशात देशात सर्वत्र ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात काही भागांमध्ये हा निर्णय पूर्वीपासूनच राबविण्यात येत आहे. औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांनीही हा निर्णय एक ऑगस्टपासून शहरात लागू करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

या बैठकीत आधीच डिझेलची दरवाढ, टोलनाके तसेच स्पेअर पार्ट महाग झाल्याने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. अनेक कंपन्या तसेच दुकानदार हे मालवाहतुकीचा भाव वाढवून देत नाही. यात माल उतरविण्यासाठी ट्रान्स्पोर्टरलाच खर्च करावा लागत आहे. यामुळे माल सुरक्षितरित्या आणून देण्याची जबाबदारी ही मालवाहतूकदारांची असेल. ट्रकमधून माल उतरविण्याची जबाबदारी माल मागवणाऱ्याची असेल. ट्रक चालक आता आगामी काळात कोणत्याही प्रकारचा पैसा हमाल किंवा माल उतरविण्यासाठी देणार नाही, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

ट्रक चालकांचे काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करणे ही जबाबदारी असते. मात्र अनेकदा ट्रक किंवा ट्रान्सपोर्टवाल्यांकडून लोडिंग-अनलोडिंगसाठी ‘वराई’ घेण्यात येत असते. काही कंपन्यांमध्ये माल उतरविल्यानंतर मापाडी बोर्डाच्या नावाखाली काही जण चालकांना थांबवून जबरदस्तीने पावती देऊन पैसे मागत असतात. माल उतरविण्याची जबाबदारी आता संबंधित माल मागविणाऱ्या मालकाची असणार आहे. यामुळे ही ‘वराई’ची जबाबदारी संबंधित मालकाची राहणार आहे. माल उतरविण्यासाठी पूर्वी ट्रकचालकांकडून परिश्रम करणाऱ्यांना चहा-पाण्यासाठी पैसे दिले जात होते. हे पैसे त्यांच्या हमालीच्या पैशाशिवाय मिळत होते. काही वर्षांपासून वराई किंवा डाला नावाने ही प्रथा आता वसुली बनली आहे. याचा फटका ट्रकचालकांना तसेच ट्रान्सपोर्टधारकांना बसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या