Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआता बेघर गरिबांनाही मिळणार लस 

आता बेघर गरिबांनाही मिळणार लस 

औरंगाबाद – Aurangabad

शहरातील कोरोना प्रतिबंधासाठी शहरातील निराश्रीतांचे पुढील आठवड्यापासून लसीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम राबवण्यासाठी पुढील आठवड्यापासून पालिकेची पथके रस्त्यावर उतरणार आहेत. यासाठी पोर्टलवर स्वतंत्र साईट तयार करुन त्या माध्यमातून या सर्वांची नोंदणीही केली जाणार आहे.

- Advertisement -

कोरोना लसीकरण करताना शासन निर्देशांनुसार आधार कार्डचा क्रमांक देणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बेघर व्यक्ती, भिकारी, रस्त्याच्या बाजूने दुकाने थाटून व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसते. त्यांना कोविन अ‍ॅपवर जाऊन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे लसीकरणापासून ते सुटण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुढील आठवड्यापासून अशा व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एक स्वतंत्र पोर्टल साईट तयार करुन त्या माध्यमातून बेघर व्यक्ती, भिकारी, रस्त्याच्या बाजूने दुकाने थाटून व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पथके तयार केली जाणार असून ही पथके रस्त्यावर उतरुन ज्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही, अशा सर्वांचे लसीकरण करेल. बेघर व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या