आता पेट्रोल पंपावर 'मोबाईल गुरू'ची नेमणूक

लसीकरण तपासण्याचे करणार काम
आता पेट्रोल पंपावर 'मोबाईल गुरू'ची नेमणूक

औरंगाबाद - aurangabad

पेट्रोल पंपांवर (Petrol pump) पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना 'नो व्हॅक्सिन नो पेट्रोल' (No vaccine, no petrol) हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन नियम जाहीर केले आहे. या अंतर्गत पेट्रोल पंपावर व्हॅक्सीन घेतल्याचे प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी आवश्यक तेवढे मोबाईल गुरू ठेवण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पंपांवर लसीकरण मोहिमेबाबत आवश्यक कार्यवाही होत नसल्याबाबतही जिल्हा पुरवठा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer) कार्यालयाकडून आईल कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार, 'मिशन कवचकुंडल'अंतर्गत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेले आहे. यानंतर पंपावर कारवाई होत नाही. जिल्ह्यात असलेल्या कंपनीच्या पंपधारकांना दिलेल्या सुचनेनुसार केलेल्या कार्यवाहीचा कार्यालयास अहवाल सादर करावा असेही आदेश देण्यात आले आहे.

शिवाय पेट्रोल पंपावर लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी मोबाइल गुरू नेमण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे मोबाइल गुरू हे कोव्हिड अॅपवर व्हॅक्सिनेशन प्रमाणपत्र तपासणार आहे. त्यांच्याकडून कोव्हीडचा पहिला लस किंवा दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासून पावतीवर व्हॅक्सिनेशनचा शिक्का मारावा. पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीने ही पावती घेऊन वाहनधारकांना पेट्रोल किंवा डिझेल द्यावे, अशाही सूचना या आदेशाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

या आदेशामुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांवर ताण वाढणार असून या प्रक्रियेसाठी पेट्रोल भरण्यास उशीर होईल, अशी शक्यता पंप चालकांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com