आता घरबसल्या भरा मालमत्ता कर, पाणीपट्टी!

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

महापालिकेने (Municipal Corporation) नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर (Property tax) आणि पाणीपट्टी भरण्याची ऑनलाईन (Online) सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून २ लाख ८६ हजार मालमत्ताधारक आणि १ लाख २० हजार पाणीपट्टीधारकांचा डेटा त्यावर अपलोड केला आहे. ॲपच्या माध्यमातून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची माहिती होणार असून (Online payment) ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Commissioner Astik Kumar Pandey) यांनी दिली.

महापालिकेकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता कराचे मागणीपत्र मालमत्ताधारकांना दिले जात होते. त्यानंतर मालमत्ताधारक वॉर्ड कार्यालयातून कर भरणा करत असत. यावर्षी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अँम्रेक्स कंपनी जीआयएस मॅपिंग द्वारे मालमत्ताचे सर्वेक्षण करीत आहे. या कंपनीकडूनच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा डाटा ऑनलाईन केला जात असून त्यासाठी सॉफटवेअर विकसित करण्यात आले आहे. नागरिकांसाठी ऍप देखील विकसीत केले जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात मालमत्ता कराचे मागणीपत्र वाटप करता आलेले नाही. वॉर्ड कायालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही.

शहरातील २ लाख ८६ हजार मालमत्ताधारक आणि १ लाख २० हजार पाणीपट्टीधारकांचा डाटा ऑनलाईन अपलोड केला जात आहे. पाणीपट्टीचा डाटा अपलोड झाला असून मालमत्ताधारकांना डाटा अपलोड करण्याचे काम २६ एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर नागरिकांना आता अँपदारे घरबसल्या मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची माहिती घेऊन बँकेचे ऍप आणि गुगल ऍप द्वारे भरता येणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात मागणीपत्र देता आले नाही. नागरिकांनी मे महिन्यात कराचा भरणा करून सुटीचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रशासक पाण्डेय यांनी केले आहे.

एप्रिलची दहा टक्के सुट मेमध्ये मिळणार महापालिकेने वर्षभराचा मालमत्ता कर एप्रिल महिन्यात भरल्यास त्यारकमेवर दहा टक्के सूट दिली जाते. तसेच मेमध्ये ८ टक्‍के आणि जूनमध्ये ६ टक्के सूट मिळते. ही सुट देण्याची सवलत एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. एप्रिल महिन्याची १० टक्के सूट मे महिन्यात, मे मधील ८ टक्के सूट जून महिन्यात आणि जून महिन्याची ६ टक्के सूट जुलै महिन्यात दिली जाणार असल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *