आता प्रलंबित सुनावण्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने!

कोरोना संसर्गाचा परिणाम  
आता प्रलंबित सुनावण्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने!

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्‍हयामध्‍ये (corona) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व शासकीय कार्यालयात (Government Office) होणारी गर्दी कमी करण्‍याच्‍या हेतूने, जिल्‍हाधिकारी कार्यालय (District Collector's Office), उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) तसेच तहसिल कार्यालयात (Tehsil Office) सुनावणीसाठी प्रलंबीत असलेल्‍या सर्व अर्धन्‍यायीक प्रकरणात नियमीत पणे (Video conferencing) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व संबंधितांची नियमित सुनावणी घेऊन निर्णय घेण्‍यात येणार आहे. व्‍हीसी द्वारे सुनावणी घेण्‍याबाबतचे सविस्‍तर कार्यप्रणाली (District Collector Sunil Chavan) जिल्‍हाधिकारी सुनील चव्‍हाण यांनी निश्चित केली असून, औरंगाबाद जिल्‍हयाच्‍या वेबसाईटवर कार्यप्रणाली प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.

सुनावणी तारखेच्‍या १ दिवस अगोदर सर्व महसूल अधिका-यांना त्‍यांच्‍या सुनावणीचा बोर्ड वेबसाईटवर प्रसिध्‍द करावा लागणार आहे. सदर बोर्ड मध्‍ये सुनावणीची लिंक व पासवर्ड देण्‍यात येणार असून, सदर लिंकद्वारे सर्व संबंधित वकील व पक्षकारांना सुनावणीमध्‍ये सहभाग घेता येणार आहे.

ज्‍या पक्षकारांना सुनावणीवेळी काही कागदपत्रे सादर करावयाचे असतील, त्‍यांनी सुनावणी दिनांकाच्‍या २ दिवसापूर्वी संबंधित महसूल अधिका-यांच्‍या ई-मले आयडीवर संबंधपीत कागदपत्रे अपलोड करावीत व त्‍यानंतर संबंधित कागदपत्रे सुनावणीत मध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात येतील. सुनावणी प्रक्रिया Webex meet या अँपद्वारे करण्‍यात येणार आहे.

नव्‍याने दाखल करण्‍यात येणारे अर्धन्‍यायीक प्रकरणे, सर्व संबंधीत कार्यालयाच्‍या आवक-जावक विभागामध्‍ये व्‍यक्‍तीशः दाखल करावी लागतील. तरी सर्व वकील व पक्षकारांनी अर्धन्‍यायीक प्रकरणातील सुनावणीस व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर रहावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सुनील चव्‍हाण यांनी केलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com