Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआता घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश शक्य

आता घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश शक्य

औरंगाबाद- Aurangabad

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात (Ghrishneshwar Temple) गाभाऱ्यात जाऊन दर्शनासाठी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनलॉकनंतर भाविकांना सभामंडपातून दर्शन घ्यावे लागत होते.

- Advertisement -

आता १ मार्चपासून म्हणजेच महाशिवरात्रीपासून (Mahashivaratri) भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी दिली. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांना ही सुविधा मिळणार आहे. तसेच मंदिर परिसरात कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करणे सक्तीचे असेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

घृष्णेश्वर मंदिर (Ghrishneshwar Temple) हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून (Daulatabad) सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले ( Chhatrapati Shivaji Raje Bhosale) यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले (Maloji Raje Bhosle) यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला.

सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (Ghrishneshwar Jyotirlinga) मंदिरात पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (Ghrishneshwar Jyotirlinga) मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम ४४,४०० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (Ghrishneshwar Jyotirlinga) मंदिर हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे.

मंदिर परिसरामध्ये पाच-स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत. मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवितात. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीस्वरची मूर्तीही दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या