Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआता गुरुजींना देखील द्यावी लागणार 'परीक्षा'!

आता गुरुजींना देखील द्यावी लागणार ‘परीक्षा’!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा (exam) घेणाऱ्या शिक्षकांनाच (Teacher) आता गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी  लागणार आहे. पहिली ते दहावीतील विषयांवर ५० प्रश्‍न असलेल्या ५० गुणांच्या या परीक्षेसाठी मात्र निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यामुळे गुरुजींनाही आता चांगलाच अभ्यास करावा लागणार आहे. या परीक्षांची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. 

- Advertisement -

शिक्षकांचे विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागवी आणि स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, यासाठी आता जिल्हा स्तरावर शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठीच ही परीक्षा राहणार आहे. शिक्षक संघटनांनी सहविचार सभेत या परीक्षेला अनुमोदन दिलेले आहे. मात्र, शिक्षकांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे. असे असले तरी सर्व शिक्षकांना गुणवत्तावाढीसंदर्भात जाणीव करून देत या परीक्षेत सहभागी करून घेण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.

विजेचा धक्का लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

दरवर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या गुरुजींना द्याव्या लागणार्‍या परीक्षेसाठी पहिली ते दहावीतील इंग्रजी, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांवर आधारित प्रश्‍नपत्रिका असणार आहे. एका प्रश्‍नाला एक गुण याप्रमाणे ५० गुणांची ही परीक्षा असेल. मात्र, नीट परीक्षेप्रमाणे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची पद्धत अवलंबिली जाणार आहे. प्रश्‍नाचे उत्तर बरोबर असल्यास त्याला १ गुण दिला जाणार आहे, तर प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे असल्यास मिळाले गुणांमधून अर्धा गुण वजा केला जाणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना किमान २५ गुण मिळविणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे शिक्षकांना चांगलाच करावा लागणार आहे.

सरकारच्या आदेशानुसार, या परीक्षेसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. या समितीला शिक्षकांच्या परीक्षेसाठी प्रश्‍नपत्रिका तयार करण्याचे महत्त्वाचे काम दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. याशिवाय आर्थिक नियोजन, प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई समिती, उत्तरपत्रिका तपासणी समिती, केंद्र निश्‍चिती, बैठकव्यवस्था समितीची नियुक्‍ती केली जाणार आहे. या समितीकडून परीक्षेची तयारी सुरू होणार असली, तरी अद्याप परीक्षेचा दिवस आणि वेळ ठरलेली नाही. याबाबत स्वतंत्र आदेश जारी करून माहिती दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या